Join us  

सिद्धार्थव्यतिरिक्त 'या' १२ जणांना शेहनाज करते फॉलो; पाहा कोण आहेत 'या' व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 6:42 PM

Shehnaaz gill : गेल्या काही दिवसांपासून शहनाजची नवीन चर्चा सुरु आहे. शहनाज इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसह केवळ १२ लोकांनाच फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्देइन्स्टाग्रामवर ९.६ मिलिअन फॉलोअर्स असलेली शहनाज केवळ १३ लोकांनाच फॉलो करते.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याच्या निधनामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, या धक्क्यातून अभिनेत्री शहनाज गिल अद्यापही सावरलेली नाही. शहनाज आणि सिद्धार्थ यांची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर शहनाजची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. यामध्येच गेल्या काही दिवसांपासून शहनाजची नवीन चर्चा सुरु आहे. शहनाज इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसह केवळ १२ लोकांनाच फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे.

इन्स्टाग्रामवर ९.६ मिलिअन फॉलोअर्स असलेली शहनाज सिद्धार्थसह केवळ १२ लोकांनाच फॉलो करते. यात अनेक दिग्गज व्यक्तींचा समावेश असून या १२ व्यक्ती कोण ते पाहुयात.

१. राजीबर चीमा - शहनाज तिच्या चुलत भावाला राजीबर चीमाला फॉलो करते. शहनाज आणि शाहबाज दे दोघंही राजबीरच्या अत्यंत जवळचे आहेत.

२. कार्ला डेनिस -अर्जुन कानुनगोमुळे शहनाज आणि कार्ला डेनिस यांची ओळख झाली. आता या दोघी चांगल्या मैत्रिणी असून शहनाज तिलाही फॉलो करते. 

३. सलमान खान- शहनाज गिल अभिनेता सलमान खानची सर्वात मोठी चाहती आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. बिग बॉस १३ मध्येदेखील तिने हे मान्य केलं होतं. विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वीपासून ती सलमानला फॉलो करते.

४. बादशाह -शेहनाज गिल प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या फ्लाय गाण्यात दिसली होती. शेहनाज त्याला देखील इन्स्टावर त्याला फॉलो करते.

५. कार्तिक आर्यन -बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन यालादेखील शहनाज फॉलो करते.

६. कौशल जोशी -

कौशल जोशी हे टीव्हीचे प्रसिद्ध पीआर मॅनेजर आहेत. त्यांनी शहनाजचं पीआरदेखील सांभाळलं आहे.

७. जस्टीन बीबर -प्रसिद्ध कॅनेडियन गायक जस्टिन बीबर यालाही शहनाज फॉलो करते.

८. नवराज संधू -नवराज मूळचा पंजाबचा असून शेहनाज गिलचा जवळचा मित्र आहे. 

९. माही विज -शहनाजप्रमाणेच माही विजदेखील सिद्धार्थची खूप जवळची मैत्रीण होती. त्यामुळे शहनाज तिलादेखील फॉलो करते. विशेष म्हणजे छोट्या पडद्यावरील माही विज अशी व्यक्ती आहे जिला शहनाज फॉलो करते.

१०. सिद्धार्थ शुक्ला - दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या मैत्रीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. शहनाज सिद्धार्थला फॉलो करण्यासोबतच त्याच्यासोबतचे व्हिडीओ, फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर करायची.

११. ओशन राज-ओशन राज हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. ते संगीत उद्योगाशी निगडीत आहेत.

१२. शाहबाज -शाहबाज हा शहनाजचा सख्खा भाऊ आहे.

१३. केन फर्न -केन फर्न्स हा प्रसिद्ध डिझायनर आहे. कित्येक वर्षांपासून केन हा सिद्धार्थ आणि शहनाजचा मित्र आहे.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लासलमान खानशेहनाझ गिल