Join us  

सिद्धार्थ सागरने केला खुलासा त्याची आईच द्यायची त्याला जेवणातून ड्रग्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 5:47 AM

सिद्धार्थ सागरला कॉमेडी सर्कस या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला सिद्धार्थ गेल्या कित्येक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर ...

सिद्धार्थ सागरला कॉमेडी सर्कस या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे नावारूपाला आलेला सिद्धार्थ गेल्या कित्येक दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. तो कित्येक महिन्यांपासून गायब असल्याचे त्याच्या एका मैत्रिणीने फेसबुक या सोशल नेटवर्किंगवरून सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसांत सिद्धार्थने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ पोस्ट करून तो सुरक्षित असल्याचे त्याच्या चाहत्यांना सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने गेल्या काही महिन्यात त्याच्या आयुष्यात काय काय घडले हे सांगितले आहे. सिद्धार्थने सांगितले की, माझ्या आई वडिलांचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. माझे वडील मला कधीतरी भेटायला येतात. मी माझ्या आईसोबत राहातो. माझ्या आईच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक व्यक्ती आली आणि त्यांच्यासोबत तिला नव्याने आयुष्याला सुरुवात करायची असे मला सांगितले. प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार आहे हा विचार करून मी देखील तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. पण काहीच दिवसांत माझ्या आईचे वागणे खूप बदलले असल्याचे माझ्या लक्षात आले. मला त्या दरम्यान काही तरी वेगळे फिल व्हायला लागले होते. माझे वजन कमी होत होते. त्यामुळे मी स्मोकिंग कमी केले आणि कॉफी जास्त पिऊ लागलो होतो. मी याविषयी आईला सांगितले तर तिने मला सांगितले की, मला बायपोलर नावाचा आजार आहे आणि त्यासाठी ती मला न सांगता माझ्या जेवणातून ड्रग्स देत आहे. या आजाराविषयी ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण मला या आजाराविषयी माहिती होते आणि मला स्वतःमध्ये या आजाराचे संकेत कधीच दिसले नव्हते. माझ्या आर्थिक व्यवहारात सुयश गाडगीळ (आईच्या आयुष्यात असलेली व्यक्ती) ढवळाढवळ करू लागला होता. त्यामुळे अनेकवेळा आमच्यात भांडणं होत असे. माझ्या आईने मला न सांगता माझे ९०-९५ लाख खर्च केले होते. काहीच दिवसांनी त्या दोघांनी मिळून मला रिहॅबिटेशन सेंटरमध्ये टाकले. तिथे माझ्यावर प्रचंड अत्याचार व्हायचे. मला तिथे मारले जायचे. काही वेळा तर मी रक्तबंबाळ व्हायचो. माझी शुद्धदेखील हरपायची. काय करायचे मला काहीच सुचत नव्हते. कसेतरी करून मी माझ्या मॅनेजरशी संपर्क केला आणि त्याने मला तिथून बाहेर काढले. घरी आल्यावर सगळे काही सुरळीत होईल असे मला वाटत होते. पण मी गोव्याला गेलो असताना मला उचलून पागलखान्यात दाखल करण्यात आले. तिथेदेखील मला टॉर्चर करण्यात आले. शेवटी माझ्या आईने मला तिथून काढून आशा की किरण रिहॅबमध्ये शिफ्ट केले. तिथे मला सगळ्यांनी खूप मदत केली. औषधांमुळे माझी अशी परिस्थिती झाली असल्याचे त्यांनी मला सांगितले. आज त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी परतू शकलो आहे. Also Read : ​मी पागलखान्यात होतो! कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा धक्कादायक खुलासा!!