Join us

श्वेताचा कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:59 IST

कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसाद बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. तिने त्यानंतर मकडी, इक्बाल यांसारख्या चित्रपटात ...

कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसाद बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. तिने त्यानंतर मकडी, इक्बाल यांसारख्या चित्रपटात काम केले. तिला मकडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. दरम्यानच्या काळात श्वेता काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली होती. अनेक वर्षांनंतर श्वेता छोट्या पडद्यावर परतत आहे. कहानी घर घर की या मालिकेची निर्मिती बालाजी टेलिफ्लिम्सने केली होती. ती आता बालाजीच्याच चंद्र-नंदिनी या मालिकेत नंदिनी या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका एकता कपूरचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे मानले जाते.