Join us  

तब्बल १३ वर्षानंतर वडील राजा चौधरीला भेटली मुलगी पलक,एक्स वाईफसाठी दिला त्याने खास मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 6:03 PM

Raja Chaudhary Thanks To Ex Wife Shweta For Taking Care Of His Daughter Palak: इतकी वर्षे मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी नव्हती. पण आता ती मोठी झाली आहे आणि स्वतःचे निर्णय ती घेऊ शकते.

श्वेता तिवारीची मुलगी  लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या ती तिच्या ‘रोजी’ या आगामी सिनेमाच्या तयारीत बिझी आहे. पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. नुकताच राजा चौझरी मुलगी पलकला भेटला. १३ वर्षानंतर मुलीला भेटून खूप आनंद झाल्याचे राजा चौधरीच्या चेह-यावर झळकत आहे. बिझी शेड्यअलमधूनही पलकने वडील राजा चौधरीला भेटायला गेली.

इतक्या वर्षानंतर पलकला पाहून राजा चौधरी भावूक झाला होता. राजा चौधरीने त्यांच्या या खास भेटीचा फोटो चाहत्यांसह शेअर करत समर्क अशी कॅप्शनही दिली आहे. आयुष्यातील सुंदर पल, १३ वर्षानंतर मुलीला भेटतोय, अगदी छोटी होती तेव्हा तिला शेवटचे पाहिले होते आणि आता माझी चिमुरडी मोठी झालीय. असे सांगत भावनिक मेसेजही त्याने पत्नी श्वेतासाठी लिहीला आहे.

राजाने भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी विसरत मुलगी पलकसह दीड तास खूप सा-या गप्पागोष्टी केल्या. पलकनेही तिचे आजी-आजोबा, काका यांच्या सगळ्यांविषयी विचारणा केली. कामातून वेळ मिळताच सगळ्यांना भेटण्याचीही इच्छा तिने व्यक्त केली.

 

राजा आणि पलक दोघेही फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात असतात.राजा त्याच्या आई- वडिलांसह मेरठमध्ये राहतो.काही कामानिमित्त तो मुंबईत आला होता.मुलीला भेटून सगळ्या गोष्टी मिळाल्याचा आनंद झाल्याचे राजाने सांगितले.

आयुष्याने मला दुसरी संधी दिली आहे. मला आणि माझ्या मुलीच्यामधले नाते ठीक करायचे आहे. सर्वकाही मेतभेद दूर करायचे आहे. माझे प्रेम कधीच मुलीसाठी कमी झाले नाही. इतकी वर्षे मला माझ्या मुलीला भेटण्याची परवानगी नव्हती. पण आता ती मोठी झाली आहे आणि स्वतःचे निर्णय ती घेऊ शकते. माझ्या मुलीच्या शाळेपासूनच्या सगळ्या गोष्टी, तिच्या आवडी-निवडी सगळ्या गोष्टी मला आठवतात. आज तिला इतकी मोठी झाल्याचे पाहून मनं भरुन आले. तिला भेटून खूप आनंद झाला यासाठी श्वेता तिवारीचे आभार मानत असल्याचे त्याने म्हटले आहे.  

 

श्वेता आणि राजा यांनी सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेतला होता. राजा चौधरीनंतर श्वेताने अभिनव कोहलीसह लग्न केले होते. मात्र अभिनव कोहलीसह तिचा घटस्फोट झाला असून मुलाची कस्टडी श्वेताकडे आहे. 

टॅग्स :श्वेता तिवारी