Join us  

ही अभिनेत्री सांगतेय, केवळ मुलीसाठी केली ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 6:27 PM

ही अभिनेत्री सध्या एका प्रसिद्ध मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून ही मालिका केवळ तिच्या मुलीच्या सांगण्यामुळे तिने स्वीकारली असल्याचे तिने मुलाखतीत नुकतेच सांगितले.

ठळक मुद्देशुभांगी अत्रे सांगते, या मालिकेत भूमिका साकारायला मी घाबरत होती असे नाही. पण एखादी गोष्ट माझ्याकडून चुकीची घडली तर त्याचा व्यक्तिरेखेवर परिणाम होईल असे मला वाटत होते आणि त्यात मी शिल्पाला दुसऱ्यांदा रिप्लेस करत होते. पण माझी मुलगी अर्शीमुळे मी तयार झाले.

भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेतील अंगुरू भाभी ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही व्यक्तिरेखा पूर्वी शिल्पा शिंदे साकारत होती. पण या मालिकेचे निर्माते आणि शिल्पा यांच्यात काही वाद झाल्याने तिने ही मालिका सोडली. 

शिल्पानंतर अंगुरी भाभी ही भूमिका कोणीच चांगल्याप्रकारे साकारू शकणार नाही असेच सगळ्यांना वाटत होते. पण शुभांगी अत्रेने या भूमिकेला योग्य न्याय दिला आणि काहीच दिवसांत प्रेक्षकांनी शुभांगीला अंगुरी भाभी म्हणून स्वीकारले. प्रेक्षकांना शुभांगीची ही भूमिका आवडत असल्याचे ते नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला सांगत असतात.

शुभांगी अत्रे अंगुरी भाभीची भूमिका खूपच चांगल्याप्रकारे साकारत असली तरी या मालिकेची ऑफर आल्यानंतर शुभांगी द्विधा मनस्थितीत अडकली होती. भाभीजी घर पर है ही मालिका स्वीकारू की नको याचा शुभांगीने अनेक दिवस विचार केला होता आणि हा विचार करण्यामागे एक खास कारण होते. या मालिकेत ती शिल्पा शिंदेला रिप्लेस करणार होती आणि योगायोग म्हणजे त्याच आधी काही महिन्यांपूर्वी चिडियाँ घर या मालिकेत देखील तिने शिल्पाला रिप्लेस केले होते. त्यामुळे पुन्हा शिल्पाला रिप्लेस करायला ती तयारच नव्हती. तिनेच ही गोष्ट हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. 

शुभांगी अत्रे सांगते, या मालिकेत भूमिका साकारायला मी घाबरत होती असे नाही. पण एखादी गोष्ट माझ्याकडून चुकीची घडली तर त्याचा व्यक्तिरेखेवर परिणाम होईल असे मला वाटत होते आणि त्यात मी शिल्पाला दुसऱ्यांदा रिप्लेस करत होते. त्यामुळे मला ही मालिका स्वीकारायची नाहीये असे मी ठरवले होते. पण शिल्पाला मी दुसऱ्यांदा रिप्लेस करायला तयार झाली यामागे केवळ माझी मुलगी अर्शी आहे. मला आलेल्या या संधीवर मी पुनर्विचार करावा असे तिचे म्हणणे होते. 

टॅग्स :शिल्पा शिंदेभाभीजी घर पर है