Join us

या कारणामुळे बंद पडले शेर-ए-पंजाबा मालिकेचे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 16:30 IST

जयपूरमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यावर काही संघटनांनी केलेल्या हल्ल्यामुळे ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेचे चित्रीकरणही एक दिवस ...

जयपूरमध्ये ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यावर काही संघटनांनी केलेल्या हल्ल्यामुळे ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ मालिकेचे चित्रीकरणही एक दिवस ठप्प पडले.भन्साळी यांच्यासारख्या नामवंत दिग्दर्शकाबरोबर करण्यात आलेल्या या असंस्कृत वर्तणुकीमुळे व तिच्या संभाव्य परिणामांमुळे ‘लाईफ ओके’वरील ‘महाराजा रणजितसिंग’ या आगामी मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता शालीन भानोत खूप अस्वस्थ झाला होता.भन्साळीवरील हल्ल्यानंतर काही संघटना या मालिकेविरोधातही निदर्शने करतील, अशी भीती वाटल्याने राजमहालाच्या अधिकारा-यांनी त्यांना ‘महाराजा रणजितसिंग’ मालिकेसाठी चित्रीकरणाची परवानगी नाकारली आहे, ही गोष्ट त्यांना समजली. त्यामुळे या युनिटने एक दिवसाची सुटी घेतली आणि ते रणथंबोर अभयारण्याकडे गेले.शालीन सांगते, “पद्मावतीच्या सेटवर जे घडलं, त्यामुळे आम्ही सारे आतून हादरून गेलो आहोत. हे केवळ प्रतिबंधात्मक उपाय आहेत. अशा गोष्टी घडणं हे दुर्दैवी आहे. या घटनेमुळे आमचा चित्रीकरणाचा एक दिवस बुडाला. आता लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल, अशी आशा आहे.”या मालिकेच्या चित्रीकरणाला दीड दिवसानंतर प्रारंभ झाला खरा, परंतु सेटवर भीतीचे वातावरण होते.