Join us  

Shocking! 'भाभीजी घर पर हैं' फेम दीपेश भानचं निधन, टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 12:27 PM

Deepesh Bhan Passes Away: टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता दीपेश भानने जगाचा निरोप घेतला आहे.

टीव्ही इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता दीपेश भान(Deepesh Bhan)ने जगाचा निरोप घेतला आहे. दीपेश 'भाभीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hai) या लोकप्रिय टीव्ही मालिकेत मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेशी तो बराच काळ जोडला गेला होता. मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी अभिनेत्याच्या निधनाला दुजोरा दिला आहे. दीपेश यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. दीपेशचे लग्न २०१९ मध्ये दिल्लीत झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश शुक्रवारी क्रिकेट खेळत होता, मात्र क्रिकेट खेळत असताना तो अचानक कोसळला, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी अत्याला मृत घोषित केले. अभिनेता वैभव माथूरनेही दीपेश भानच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दीपेशच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करताना ते म्हणाले की, होय तो आता राहिला नाही. यावर मला काहीही बोलायचे नाही, कारण सांगण्यासारखं काही उरलेलं नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, दीपेश आणि माथूर या शोमध्ये दोन मित्रांच्या भूमिकेत होते आणि दोघांमध्ये छान बॉण्डिंग झाले होते.

दीपेश बराच काळ टीव्ही जगताशी जोडला गेला होता. 'भाभीजी घर पर हैं'पूर्वी तो 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर'सह अनेक कॉमेडी शोचा भाग होता. याशिवाय त्याने आमिर खानसोबतही काम केले आहे. तो आमिर खानसोबत T20 वर्ल्ड कपच्या जाहिरातीत दिसला होता आणि २००७ मध्ये रिलीज झालेल्या 'फालतू उटपटांग चटपटी कहानी' या चित्रपटात त्याने काम केले होते.

टॅग्स :भाभीजी घर पर है