Join us  

Video जेव्हा हळदीच्या रंगात रंगली अंकिता लोखंडे, व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 3:33 PM

अंकिताने (Ankita Lokhande Wedding) तिच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.आता ऑफिशिअली मिसेस जैन बनली असल्याची एक पोस्ट तिने शेअर केली आहे.अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या अंकिता लोखंडे (Ankita Lokhande Wedding) च्या लग्नाचेच व्हिडीओ धुमाकुळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर नजर टाकताच फक्त आणि फक्त अंकिताच्या लग्नाची चर्चा होत आहे. अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. लग्नाआधी पार पडलेल्या कार्यक्रमाचे व्हिडीओ आणि लग्नानंतरचे व्हिडीओ इतकंच काय तर नववधू अंकिताने सासरी किचनमध्ये बनवलेले पहिले जेवण सगळ्या - सगळ्या गोष्टींची चर्चा होत आहे. 

नुसती चर्चाच होतेय अस नाहीतर व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना अंकिताचा प्रत्येक अंदाज पाहायला मिळत आहे. हे व्हिडीओ पाहून नेटीझन्स तिला चागंलेच ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.ओव्हर एक्टींग करत असल्याचे नेटीझन्स बोलताना दिसत आहे. अंकिताची लग्नातली ओव्हर एक्सायटमेंट पाहून तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत.

दरम्यान अंकिताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. हळदी कार्यक्रमातला हा व्हिडीओ आहे. नातेवाईक मित्रमंडीळींसोबत ती डान्स करताना दिसत आहे. हळदीच्या रंगात अंकिता लोखंडे मनमुराद डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्न ठरल्यापासून ते मेहंदी, हळदी रिसेप्शनपर्यंतचे सगळेच फोटो व्हिडीओला चाहते पसंतीही देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चाहत्यांच्या उमटणार्‍या प्रतिक्रीया पाहून लग्नातला तिचा अतिउत्साह तिच्या चाहत्यांना काही पटला नसल्याचे दिसत आहे. 

 

तुर्तास सोशल मीडियावर अंकिताने तिच्या लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत.आता ऑफिशिअली मिसेस जैन बनली असल्याची एक पोस्ट तिने शेअर केली आहे.अंकिताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अंकिताने लग्नात सुंदर सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता, तर तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये लाल रंगाची साडी नेसली होती. 

टॅग्स :अंकिता लोखंडे