Join us  

साधीसुधी दिसणारी शेहनाज गिल अचानक कशी झाली बोल्ड, पाहा तिचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 5:47 PM

'बिग बॉस १३' मध्ये झळकली तेव्हा तिच्या क्युट अंदाजाने तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शोमधून बाहेर पडताच शहनाजने सर्वात आधी स्वतःच्या लूकवर मेहनत घेतली.

पंजाबच्या कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी शेहनाज गिल सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. 'बिग बॉस १३' मध्ये झळकली तेव्हा तिच्या क्युट अंदाजाने तिने रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. शोमधून बाहेर पडताच शहनाजने सर्वात आधी स्वतःच्या लूकवर मेहनत घेतली. वजन कमी करत स्लिम झाली. फक्त दोनच वर्षांमध्ये शहनाज गिल जबरदस्त नवीन लूक मिळवला.

 

ग्लॅमरस लूकमध्ये तिचे फोटो पाहून सारेच आश्चर्यचकित होतात. इतकी ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसू लागली आहे.शहनाज गिलचा नवीन लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच आहे.तिची एकेक अदा कॅमे-यात कैद झालीय.फोटोशूट वेळी शेहनाजच्या अदांनी सा-यांना वेड लावलंय.सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.

चमचमत्या ग्लॅमर आणि फॅशन जगतात वावरत असताना तुमची स्टाइलच तुमचं व्यक्तीमत्त्व ठरवत असते. यशाच्या शिखरावर असणा-या व्यक्तीला फॉलो करणा-यांची संख्याही तितकीच असते. त्यामुळेच शहनाझनं अभिनयकोशल्यासोबत स्वत:मध्ये बरेच बदल घडवून आणलेत. तिनं आपल्या फिटनेस आणि फिगरकडेही लक्ष दिलं आहे. काळानुसार पाहता या अभिनेत्रीनं वजन कमी केलं आहे आणि आता ती स्लिम बनली आहे.

सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बिग बॉसमुळे शेहनाजला प्रचंड लोकप्रियता लाभली होती.

त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. तिच लोकप्रियता इनकॅश करण्याच्या ती प्रयत्नात आहे. सोशल मीडियावर तिचे इतरही व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आजही व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांचे तुफान मनोरंजन करताना दिसते. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :शेहनाझ गिल