Join us  

सिद्धार्थनं शहनाजची ती गोष्ट ऐकली असती तर.., केआरकेचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 3:37 PM

केआरकेनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केआरकेनं सिद्धार्थच्या मृत्यूच्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं ते सांगितलं आहे.

ठळक मुद्देअभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने २ सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने फक्त चाहतेच नव्हे तर संपूर्ण बॉलिवड क्षेत्राला मोठा धक्का बसलाय.

वयाच्या उण्यापु-या 40 व्या वर्षी जगाला अलविदा म्हणणा-या सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानं सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. सिद्धार्थची अतिशय जवळची मैत्रिण शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिची अवस्था पाहून तर प्रत्येकाचे डोळे पाणावले. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी ओशिवारा स्मशानभूमीत आलेल्या शहनाजला स्वत:ला सावरणंही कठीण जात होतं. अद्यापही ती काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. अशात बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक केआरके (KRK)अर्थात कमाल आर खान (Kamaal R Khan) याने सिद्धार्थच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

केआरकेनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत केआरकेनं सिद्धार्थच्या मृत्यूच्या त्या रात्री नेमकं काय झालं होतं ते सांगितलं आहे. या व्हिडीओत केआरके म्हणतो, सिद्धार्थ शुक्लानं शहनाजच्या कुशीत जीव सोडला, असं मीडिया रिपोर्ट सांगत आहेत. ही गोष्ट एकदम खरी आहे. शहनाजच्या वडीनांनी सांगितलं आहे की, रात्री सिद्धार्थला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याने शहनाजला जवळ थांबून पाठ थोपटायला सांगितली. रात्री 3 च्या सुमारास सिद्धार्थला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं.  शहनाजने त्याला थंड पाणी दिलं. सकाळी शहनाजनं सिद्धार्थला उठवायचा प्रयत्न केला असता त्यानं कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्याची कुठलीही हालचाल नव्हती. शहनाज जोरात किंचाळली आणि तिने सिद्धार्थच्या कुटुंबीयांना माहिती दिली.’

पुढे तो म्हणतो, ‘संध्याकाळी सिद्धार्थला अस्वस्थ वाटू लागल्यानं शहनाजने त्याला डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली होती. एकदा डॉक्टरांना दाखवू म्हणून ती त्याच्या मागं पडली होती. पण सिद्धार्थने डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला. सिद्धार्थ जिद्दी होता, त्यानं माझं ऐकलं नाही, असं शहनाजचं म्हणणं होतं. सिद्धार्थने शहनाजचं ऐकलं असतं तर कदाचित आज तो जिवंत असता.’

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाकमाल आर खान