Join us  

शंतनू माहेश्वरी आणि विग्नेश पांडे करणार ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’च्या तिसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 5:57 AM

भारतातील काही अतिशय गुणी अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने रसिकांची मने जिंकलेला ‘झी टीव्ही’वरील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी ...

भारतातील काही अतिशय गुणी अभिनेत्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने रसिकांची मने जिंकलेला ‘झी टीव्ही’वरील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअॅलिटी कार्यक्रमाची तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या आधीच्या सीझनमध्ये भारतातील अभिनय क्षेत्राला कार्तिकेय राज, तमन्ना दीपक, कार्तिकेय मालवीय आणि प्रणीत यासारखे गुणवान बालकलाकार दिले असून त्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये  भारताचे भावी सुपरस्टार बनविण्याच्या दृष्टीने लहानमुलांमधील कसदार अभिनयगुणांचा शोध घेतला जाणार आहे. आता मुलांमधील अभिनयगुणांचा शोध घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये सूत्रसंचालनासाठी टीव्हीवरील देखणा अभिनेता शंतनू माहेश्वरी आणि नामवंत शब्दभ्रमकार विग्नेश पांडे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याच्या कल्पनेने उत्साहित झालेल्या शंतनूने सांगितले, “‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या सूत्रसंचालनासाठी माझी निवड केल्यामुळे मी अत्यंत उत्सुक बनलो आहे. या कार्यक्रमातून भारतातील लहान मुलांमध्ये दडलेल्या अभिनेत्याची झलक आपल्याला दिसत असल्याने मला हा कार्यक्रमअतिशय आवडतो आणि मला लहान मुलांशी गप्पा मारायलाही खूप आवडतात. या कार्यक्रमामुळे मुलांना कॅमेऱ्यापुढे उभे राहण्याची सवय होते; तसंच जगाला तोंड देण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण होतो. त्यामुळे या मुलांच्या भवितव्याला आकार देण्यात हा कार्यक्रम मदतीचा हात पुढे करतो, असं मला वाटतं. मला आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागले आहेत.विग्नेश पांडे म्हणाला, “‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यास मी उतावीळ झालो आहे. आजच्या काळातील लहान मुलांमध्येही भरपूर गुण भरलेले असतात आणि व्यासपिठावर प्रेक्षकांसमोर त्यांच्यातील या अभिनयगुणांचं प्रत्यक्ष दर्शन घेणं हा एक संपन्न करणारा अनुभव असतो. या मुलांमधील उत्साह काही वेगळाच असतो आणि ती आपल्या या कामात जो विधायक आणि उत्साह भरतात, ते पाहून मलाही स्फूर्ती येते. या कार्यक्रमाची ही आवृत्ती नक्कीच सुपरहिट ठरेल. मी, खरं म्हणजे एक शब्दभ्रमकार, प्रथमच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत असून मीएकाच वेळी उत्साहित आणि काहीसा धास्तावलेला आहे.”