Join us  

'सूर नाव ध्यास नवा' झालायं हा बदल, परीक्षकांच्या खुर्चीत दिसत नाहीय ही व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 7:15 AM

कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कलर्स मराठीवर सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सूरांचे, स्वप्न सार्‍यांचे” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी स्वप्नांना वयाची अट नसणार कारण  या पर्वाचे वैशिष्ट्यच आहे ५ ते ५५ वयोगटातील सुरवीर या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुरवीर शोधून काढले आणि यामध्ये निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये मेगा ऑडिशनची फेरी पार पडली. त्यामधून २२  सुरवीरांची निवड झाली आहे. आता महाराष्ट्रातील या २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास सुरू झाला आहे. मागील पर्वाप्रमाणेच महाराष्ट्राची लाडकी स्पृहा जोशी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सुरवीरांची पारख करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत असणार आहे आपल्या स्वरांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे महेश काळे, अष्टपैलू अदाकार अवधूत गुप्ते... या पर्वाचा ध्यास देखील उत्तमातून उत्तम सुर शोधणे हाच असणार आहे. मात्र यावेळेला महेश काळे आणि अवधूत गुप्तेसह परीक्षकांच्या खुर्चीवर आपल्याला शाल्मली खोलगडे दिसते नाहीय. त्यामुळे तिचे फॅन्स नक्कीच तिला मिस करत असणार यात काही शंका नाही.  

संगीत आणि मराठी माणसाचे अतूट नाते आहे. संगीताला रसिकांनी नेहेमीच आपल्या हृदयात जपलं आहे.  महाराष्ट्राने आजवर अनेक दर्जेदार गायक आपल्याला दिले आहेत. सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या तिसर्‍या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये या पर्वाबद्दलची खूप उत्सुकता होती. ऑडिशन्सच्या दमदार भागांनंतर कार्यक्रमाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मेगा ऑडिशनमधून निवड झालेल्या २२ स्पर्धकांमध्ये आता विजेतेपद मिळविण्याची चुरस बघण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.. रसिक प्रेक्षकांना या पर्वामधून सुरेल संगीतिक नजराणा मिळणार आहे यात शंका नाही 

टॅग्स :सूर नवा ध्यास नवास्पृहा जोशीमहेश काळे