Join us  

'शक्ति' फेम अभिनेता अनिरुद्ध दवेची कोरोनामुळे बिघडली तब्येत, आयसीयूत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 12:39 PM

भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अनिरुद्ध दवेला कोरोनाची लागण झाली होती.

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यादरम्यान आता असे वृत्त समोर आले आहे की पटियाला बेब्स आणि शक्ति या मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता अनिरुद्ध दवेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र तब्येत आधीपेक्षा बिघडल्यामुळे त्याला आयसीयूत हलवण्यात आले आहे. ही माहिती त्याच्या मित्राने दिली आहे.

अनिरूद्ध दवे भोपाळमध्ये एका वेबसीरिजचे शूटिंग करत होता, त्यावेळी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर त्याला हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र त्याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

अनिरुद्धच्या जवळचा मित्र अजय सिंह चौधरीने याबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, ‘अनिरुद्ध जेव्हा वेबसीरिजचे शूटिंग करत होता तेव्हा त्याला कोरोना झाला. त्याने मुंबईत परत येण्याऐवजी भोपालमधील रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पण नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार त्याला जास्त इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे त्याला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.

अनिरुद्धने मागील आठवड्यात सोशल मीडियावर त्याला कोरोना झाल्याची माहिती दिली होती. तसेच यानंतर त्याने एका न्यूज चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यावेळी तो म्हणाला ‘मी स्वत:ला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करुन घेतले आहे. तसेच सर्वांनी काळजी घ्या.’ 

अनिरुद्ध टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे आणि त्याने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने शक्ति अस्तित्व के एहसास की, पटियाला बेब्ससोबत बऱ्याच मालिकेत काम केले आहे. तो अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटममध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या