Join us  

शाहरूख खानचा जबरा फॅन आहे छोट्या पडद्यावरील 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 8:00 PM

'इश्कबाझ- प्यार की एक ढिंचाक कहानी’ मालिकेत नकुल मेहता हा बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. यात तो शिवांश सिंग ओबेरॉय या रोमँटिक नायकाची भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्देशाहरूखचे अनेक चित्रपट पाहिले आणि त्याच्या भूमिकांचा अभ्यास केलाशाहरूखला ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणूनही ओळखले जाते

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ- प्यार की एक ढिंचाक कहानी’ मालिकेत नकुल मेहता हा बॉलीवूडच्या एका सुपरस्टारच्या पूर्णपणे नव्या अवतारात दिसणार आहे. यात तो शिवांश सिंग ओबेरॉय या रोमँटिक नायकाची भूमिका साकारणार आहे. पण हा रोमँटिक हीरो साकारण्यासाठी नकुलने शाहरूख खानचे अनेक चित्रपट पाहिले आणि त्याच्या भूमिकांतून त्याने प्रेरणा घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार , “एक अभिनेता म्हणून नकुलला आता केवळ शिवायसिंग ओबेरॉयपुरते मर्यादित न राहता बॉलीवूडचा नवा तारा शिवांशमध्ये रुपांतरित होण्याची गरज आहे. नकुल हा किंग ऑफ बॉलीवूड- शाहरूख खानचा जबरदस्त चाहता आहे. त्यामुळे बॉलीवूडचा सुपरस्टारची भूमिका साकारण्यासाठी त्याने शाहरूखचे अनेक चित्रपट पाहिले आणि त्याच्या भूमिकांचा अभ्यास केला. शाहरूखला ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या चित्रपटांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि म्हणूनच रोमँटिक नायकाची भूमिका साकारण्यासाठी नकुलने त्याचे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’पासून अलीकडच्या ‘जब हॅरी मेट सेजल’पर्यंतचे सर्व चित्रपट पाहिले, त्यातील शाहरूखची अदाकारी, त्याची देहबोली, संवादफेक यांचा अभ्यास केला. त्यामुळे त्याला एका रोमँटिकहीरोची व्यक्तिरेखा उभी करणं आणि त्याच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू समजावून घेणं शक्य झालं.”

नकुल मेहता हा एक मेहनती कलाकार असून आपली शिवांशची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी त्याने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही. आता त्याचा नवा अवतार पडद्यावर पाहिल्यावर त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंदाश्चर्याचा धक्का बसेल.

टॅग्स :शाहरुख खान