Join us  

SEE PIC: कपिल शर्माचा रिसेप्शन सोहळा, असा होता दोघांचा रॉयल अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:27 PM

या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.

छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. अशीच एक जोडी म्हणजे कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ.12 डिसेंबर रोजी जालंधर येथे हिंदू पद्धतीने त्याचे लग्न झाले आणि त्यानंतर 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी कारजचा कार्यक्रम पार पडला. कपिलचे प्री-वेडिंग फंक्शन अमृतसर येथे झाले.  

कपिल व गिन्नीच्या लग्नाकडे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीचे लक्ष होते. ‘द कपिल शर्मा शो’ची अख्खी स्टारकास्ट, कृष्णा अभिषेक, भारती सिंग असे सगळे या लग्नासाठी पोहोचले होते. अखेर लग्न थाटामाटात पार पडले.

या लग्नाचे खूप सारे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. 

नवरदेव बनलेला कपिल आ नवरदेव बनलेला कपिल आणि नवरी बनलेली गिन्नी यांचा पहिला फोटो दृष्ट लागावा इतका सुंदर आहे. या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.णि नवरी बनलेली गिन्नी यांचा पहिला फोटो दृष्ट लागावा इतका सुंदर आहे. या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.

 नवरदेव बनलेला कपिल आणि नवरी बनलेली गिन्नी यांचा पहिला फोटो दृष्ट लागावा इतका सुंदर आहे. या फोटोत कपिलचा शाही थाट पाहण्यासारखा आहे. तर गिन्नीचा ‘लाल जोडा’ आणि कपिलच्या ड्रेसशी मॅचिंग ज्वेलरी अप्रतिम आहे.

टॅग्स :कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ