Join us  

राधाकृष्ण मालिकेतील सुमेधचा गोपादेवी अवताराला मिळतेय रसिकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:35 PM

विशेष म्हणजे 'राधाकृष्ण' या मालिकेचा सेट हा मुंबईत नसून उंबरगाव येथे आहे. त्यामुळे कलाकारांना सततच्या शेड्युअलमुळे उंबरगाव येथे चित्रीकरण करता आणि तिथेच राहतात.

मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत 'बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. सध्या सुमेध राधाकृष्ण मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.राधाकृष्णाच्या प्रेमकथेच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आणि पाहिल्या आहेत पण प्रथमच टीव्हीवर आपण कृष्णाला गोपीच्या रूपात आपले प्रेम राधाला वाचवताना पाहायला मिळत आहे. छोट्या पडद्यावर राधाकृष्णमध्ये सुमेध मुदगलकर कृष्णाच्या भूमिकेत असून तो सध्या छोट्या पडद्यावर  एका वेगळ्‌याच रूपात पाहायला मिळतोय.कृष्णाचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांसमोर आणताना राधाकृष्णाची वेगळीच केमिस्ट्री पाहायला मिळेल. अभिनेता सुमेधलासुद्धा गोपी रूप घेताना एक वेगळाच छान अनुभव आला. सुमेध म्हणतो, “जेव्हा मी प्रथम हे कथानक ऐकले तेव्हा मला खूप उत्सुकता वाटली पण थोडी लाजही वाटली की मला स्त्रीवेश घ्यायला लागणार आहे. मी हे ह्या आधी कधीही केले नसून हा अनुभव खूपच छान असणार आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही कृष्णाचे हे वेगळे रूप  रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. 

‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारा सुमेध आपली भूमिका जास्तीत जास्त परिपूर्ण आणि अचूक साकारावी यासाठी यासाठी तब्बल 20 वेळा शॉट देत असतो. विशेष म्हणजे या मालिकेचा सेट हा मुंबईत नसून उंबरगाव येथे आहे. त्यामुळे कलाकारांना सततच्या शेड्युअलमुळे उंबरगाव येथे चित्रीकरण करता आणि तिथेच राहतात. मात्र,राधाकृष्णच्या सेटवर सुमेध मुदगलकर महाराष्ट्रीय पदार्थ मिस करत आहे. तो म्हणतो, तो महाराष्ट्रीय चव अगदी मिस करत असून त्याने आपल्या आईबाबांना सेटवर घरचे जेवण पाठवण्याचा प्रबंध करायला सांगितले आहे कारण त्याच्या व्यस्त वेळापत्रकामधून बाहेर पडून घरी जाणे त्याच्यासाठी खूपच कठीण आहे. 

टॅग्स :सुमेध मुदगलकर