Join us  

म्हणून सपना चौधरीने लपवली लग्नाची गोष्ट; डिसेंबरमध्ये वैदिक विवाह, जानेवारीत केले कोर्टमॅरेज

By रूपाली मुधोळकर | Published: October 08, 2020 11:51 AM

सपनाची आई निलम चौधरीने केला खुलासा

ठळक मुद्दे वीर साहू हा एक हरियाणवी सिंगर आहे. शिवाय एक अ‍ॅक्टरही आहे. हरियाणात तो प्रचंड लोकप्रिय आहे.

हरियाणाची डान्सर आणि बिग बॉसची माजी स्पर्धक सपना चौधरीने गुपचूप लग्नगाठ बांधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सपनाने गेल्या रविवारी एका बाळाला जन्म दिल्यानंतर या लग्नाबद्दल सर्वांना कळले. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता यावर सपनाची आई नीलम चौधरीने खुलासा केला आहे.सपनाने गतवर्षी डिसेंबर महिन्यातच बॉयफे्रन्ड वीर साहूसोबत लग्न केल्याचे नीलम यांनी सांगितले.  त्यांनी सांगितले, संतमहात्म्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले होते. 15 डिसेंबर 2019 रोजी अतिशय साध्या पद्धतीने सपना व वीर यांचे लग्न झाले.  सपना व वीर एका धार्मिक कार्यक्रमात गेले होते. तिथेच त्यांनी संत महात्म्यांच्या आशीर्वादाने सांकेतिक लग्न केले. लग्नानंतर दोघांनी संत बद्री विशाल यांचे आशीर्वाद घेतले होते.

संत बद्री विशाल यांनीही या लग्नाबद्दल माहिती दिली. सपना एक सेलिब्रिटी म्हणून नाही तर एक सामान्य भक्त म्हणून आली होती. याठिकाणी तिने वीर साहूसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर ‘द वैदिक प्रभात फाऊंडेशन’च्या कार्यालयात अतिशय साध्या पद्धतीने लग्नसोहळा आयोजित केला गेला. दोघांनी एकमेकांना वरमाला घातली आणि वैदिक परंपरेनुसार एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. सपना चौधरीचा मॅनेजर, तिचे अतिशय जवळचे लोक आणि फाऊंडेशनचे काही सदस्य एवढेच या लग्नाला हजर होते. 

जानेवारी 2020 मध्ये  कोर्ट मॅरेजवैदिक पद्धतीने लग्न केल्यानंतर जानेवारी 2020 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. या लग्नाची माहिती सार्वजनिक केली गेली नाही, कारण त्या दिवसांत वीरच्या एका जवळच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. गत रविवारी सपना चौधरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर सपना लग्नापूर्वी आई बनल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यामुळे संतापून सपनाचा पती वीरने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लग्नाची माहिती दिली होती.

कोण आहे वीर साहू? वीर साहू हा एक हरियाणवी सिंगर आहे. शिवाय एक अ‍ॅक्टरही आहे. हरियाणात तो प्रचंड लोकप्रिय आहे. अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये तो गातांना व अभिनय करताना दिसला आहे. सिंगींग व अ‍ॅक्टिंगसाठी त्याने त्याची एमबीबीएसचे शिक्षण सोडले होते. त्याचे पहिले गाणे ‘थाड्डी बड्डी’ तुफान गाजले होते. पंजाबी सिनेमा ‘गांधी फिर आ गए’मध्ये त्याने काम केले होते. सपना अनेकदा वीरबद्दल बोलली आहे. ‘वीर स्वच्छ मनाचा माणूस आहे. 2015-16 मध्ये एका अवार्ड शोमध्ये आमची पहिली भेट झाली होती. पहिल्यांदा त्याला पाहिल्यावर तो प्रचंड गर्विष्ठ असल्याचे मला वाटले होते. यानंतर आम्ही पुन्हा एका अवार्ड शोमध्ये भेटलो. पण गर्दी जास्त असल्याने आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नव्हतो. तिस-या भेटीत आम्ही एकमेकांशी बोललो,’असे सपनाने सांगितले होते.या भेटीनंतर सपना व वीर यांच्यात सतत बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

सपना चौधरीने जानेवारीत केले सीक्रेट वेडिंग, ऑक्टोबरमध्ये दिला बाळाला जन्म

कधी काळी ३१०० रुपयांसाठी डान्स करणारी सपना चौधरी आता आहे कोट्यवधींची मालकीण

टॅग्स :सपना चौधरी