Join us  

​इश्क गुनाहसाठी संजय कपूर बनला शेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 11:54 AM

इश्क गुनाह या मालिकेत एक खूपच वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप आवडत असून या ...

इश्क गुनाह या मालिकेत एक खूपच वेगळा विषय हाताळण्यात आला आहे. या मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप आवडत असून या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. अस्तित्व एक प्रेमकहानी या मालिकेमुळे नावारूपाला आलेली निकी अनेजा वालिया या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी ही मालिका खूप खास आहे आणि विशेष म्हणजे या मालिकेसाठी ती अमेरिकेतील तिचे घर सोडून काही महिन्यांसाठी मुंबईत आली आहे. इश्क गुनाह या मालिकेत संजय कपूर अनंत माथुरची भूमिका साकारत आहे. त्याच्याशिवाय या मालिकेत अशीम गुलाटी, स्मृती कालरा, बिदिशा घोष-शर्मा, चेस्था भगत यासारखे नामवंत कलाकार देखील आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू असून सारे कलाकार या मालिकेच्या चित्रीकरणात चांगलेच व्यग्र आहेत. या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाल्यापासून या मालिकेची टीम हे एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहात आहेत. स्मृती मुंबईत एकटी राहात असल्याने निकी आणि संजय त्यांची विशेष काळजी घेत आहेत. या मालिकेतील भूमिका ही खूपच आव्हानात्मक असल्याने या मालिकेत काम करण्यासाठी स्मृती खूप खूश आहे. या मालिकेच्या टीमविषयी स्मृती सांगते, मला टीममधील सगळेच खूप समजून घेतात. संजयसर हे मला त्यांच्या मुलीसारखेच वागवतात. मी मुंबईत एकटी राहात असल्याने मला घरचे जेवण जेवायला मिळत नाही. त्यामुळे संजय सर स्वतः माझ्यासाठी घरून जेवण घेऊन येतात. एवढेच नव्हे तर ते अनेकवेळा माझ्यासाठी स्वतः जेवण बनवतात. मला काय खायला आवडतं हे ते अनेकवेळा मला विचारून त्याप्रमाणे पदार्थ घरून बनवून आणतात. Also Read : ​मी अभिनेत्री असल्याचे काही वर्षं तरी विसरले होतेः निकी अनेजा वालिया