Join us  

Same to Same...! भाऊ कदमचा सख्खा भाऊ दिसतो त्याच्यासारखाच हुबेहूब, फोटो पाहून व्हाल अचंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 7:00 PM

भाऊ कदमच्या भावाचा फोटो पाहून म्हणाल अरेच्चा जुडवा भाऊ तर नाही ना

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदवीर भाऊ कदमने त्याच्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. फू बाई फू या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्याला मिळालं आहे. तो सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलंच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात तो दर भागात एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या कार्यक्रमामुळे केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील त्याचे चाहते झाले आहेत. 

भाऊ कदम याने काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या भावाचे नाव आहे श्याम कदम. श्याम हुबेहूब भाऊसारखाच दिसतो. त्यामुळे हा फोटो पाहून सगळे चकीत झाले आहेत. 

एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या भाऊचे वडील बीपीटीत नोकरी करत होते. तर आई गृहिणी होत्या. बालपणापासूनच त्यांना त्यांच्या घरातले सर्व भाऊ म्हणून हाक मारतात. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

वडिलांच्या अकाली निधनानंतर घराची सर्व जबाबदारी भाऊवर पडली. तेव्हा बीपीटीमधील घरसुद्धा सोडावे लागले. वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. उदनिर्वाहासाठी त्यांनी सुरुवातीला कारकुनाचेही काम केले होते. भाऊला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. कठोर मेहनतीमुळे त्यांना हे यश गवसलं आहे.

भाऊ कदमने टाइमपास, टाइमपास २, फक्त लढ म्हणा, सांगतो ऐका, नारबाची वाडी, जाऊ द्या ना बाळासाहेब यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :भाऊ कदमचला हवा येऊ द्या