Join us  

‘ये रिश्ते है प्यार के’ मालिकेत रुपल पटेल साकारणार ही भूमिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 6:30 PM

रूपल पटेलने 'साथ निभाना सथिया' या मालिकेत रूपलने कोकिलाबेन ही भूमिका साकारली होती.  त्याशिवाय तिने शगुन  या मालिकेतही एक भूमिका साकारली होती.  तसेच पेहचान- द फेस ऑफ ट्रुथ, जागो  आणि इतर काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका  साकारल्या आहेत.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात.त्यांच्या जागी नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येतात. आता नवीन मालिका लवकरच छोट्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या गाजलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका सुरू होणार आहे. 

या  मालिकेतील  लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये तिची चर्चा सुरू आहे. या मालिकेच्या नायकाच्या भूमिकेत टीव्हीवरील सध्याचा सर्वांचा अतिशय लाडका अभिनेता शाहीर शेख असून अभिनेत्री  रिया शर्मा ही त्याची नायिका असेल. आता या मालिकेची रंजकता वाढविण्यासाठी नामवंत अभिनेत्री रुपल पटेल ही त्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

निर्मात्यांशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “रुपलची  लोकप्रियता आणि कसलेला अभिनय यांचा विचार करता ही भूमिका साकारण्यासाठी रुपलच सर्वात योग्य  कलाकार ठरते. यात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून तिच्या प्रवेशामुळे मालिकेला नवी दिशा प्राप्त होईल. तिची उपस्थिती आणि वैशिष्ट्यपूर्ण भूमिका यामुळे प्रेक्षक मालिकेला खिळून राहतील.”

‘स्टार प्लस’वरील 'साथ निभाना सथिया' या मालिकेत रूपलने कोकिलाबेन ही भूमिका साकारली होती.  त्याशिवाय तिने शगुन  या मालिकेतही एक भूमिका साकारली होती.  तसेच पेहचान- द फेस ऑफ ट्रुथ, जागो  आणि इतर काही हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका  साकारल्या आहेत. आता ती तब्बल दोन वर्षांनंतर टीव्हीच्या पडद्याकडे वळत असून तिची भूमिका नक्कीच प्रेक्षणीय असेल.