Join us  

4 वर्षे काम नव्हते, जेवायला पैसेही नव्हते, रोनित रॉयने सांगितला त्याचा संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 9:14 AM

रोनित रॉय हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक सुपरहिट ठरलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.

एखाद्याचं नशीब कधी आणि कसं पालटेल याचा काही नेम नसतो असं अनेकदा म्हटलं जातं. कलाविश्वात तर अशा गोष्टींचा अनुभव कित्येक कलाकारांना आला आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबात लहानाचे मोठे झालेले अनेक जण आज कलाविश्वातील लोकप्रिय चेहरे म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आज आपण प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयविषयी (Ronit Roy) जाणून घेऊ. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असलेला रोनित रॉयला करिअरच्या सुरुवातीला बऱ्याच संघर्ष करावा लागला. 

रोनित रॉय हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. अनेक सुपरहिट ठरलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांने सांगितले की, 'माझा पहिला चित्रपट 'जान तेरे नाम' 1992 मध्ये रिलीज झाला होता. हा ब्लॉकबस्टर होता. पण सिनेमा रिलीज होऊन 6 महिन्यांपर्यंत मला एकही कॉल आला नाही. मग मला एक नोकरी मिळाली, ती मी 3 वर्षे केली.' 

पुढे तो म्हणाले, 'मी चार वर्षे घरी बसलो. माझ्याकडे छोटी कार होती, पण पेट्रोलसाठी पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे मी आईच्या घरी जेवायला जायचो. पण मी आत्महत्या केली नाही. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

दरम्यान, रोनित रॉय छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने 'कसौटी जिंदगी की', 'क्योंकि सांस भी कभी बहू थी', 'अदालत' या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच 'आर्मी', 'हलचल', 'उडाण', 'टू स्टेटस्', 'काबील' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

टॅग्स :रोनित रॉय