‘दिल ही तो है’ या मालिकेत पूजा बॅनर्जी साकारणार ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 10:40 IST
दिल ही तो है ही बहुप्रतीक्षित मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येणार आहे. एकता कपूर या कार्यक्रमाची निर्माती असून ...
‘दिल ही तो है’ या मालिकेत पूजा बॅनर्जी साकारणार ही भूमिका
दिल ही तो है ही बहुप्रतीक्षित मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच येणार आहे. एकता कपूर या कार्यक्रमाची निर्माती असून करण कुंद्रा आणि दस का दममुळे प्रसिद्ध झालेली योगिता बिहानी या कार्यक्रमात मुख्य भूमिका साकारणार आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून या कलाकारांमध्ये आता पूजा बॅनर्जीचा समावेश झाला आहे. पूजाने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनय कौशल्याने अनेक वर्षं प्रेक्षकांना मोहित केले आहे आणि आता दिल ही तो है मालिकेत ती आरोही नावच्या एका उच्चभ्रू मुलीची भूमिका करणार आहे. आरोही ऋत्विक नून (करण कुंद्रा) या नायकाच्या प्रेमात आकंठ बुडलेली आहे आणि त्याच्याच सोबत जीवन व्यतीत करण्याची तिची इच्छा आहे. मालिकेत ती पलक शर्मा (योगिता बिहाणी) ची मैत्रीण देखील दाखवण्यात आली आहे. पूजाने आजवर एकता कपूरच्या अनेक मालिकांमधून आणि अनेक वेब सिरीजमधून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेविषयी पूजा सांगते, “मला या मालिकेबद्दल आणि माझ्या व्यक्तिरेखेबद्दल खूप उत्सुकता आहे. या मालिकेचे कथानक रंजक आहे आणि माझी व्यक्तिरेखा खूप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. मी यापूर्वी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही वेगळी भूमिका आहे. कुणाच्या तरी प्रेमात आकंठ बुडालेली आणि प्रेमभंग झालेली मुलगी साकारण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. अशी वेगळी भूमिका साकारण्याची संधी मला देत असल्याबद्दल मी दिल ही तो या मालिकेच्या टीमची आभारी आहे. ‘आरोही’ या व्यक्तिरेखेसाठी माझा लुक आणि कपडे यांबाबत प्रयोग करण्याची मला मुभा देण्यात आली आहे. मला जेव्हा या प्रॉडक्शन हाऊसचा फोन आला तेव्हा मी इंडोनेशियात होते आणि बालाजी हे माझे जणू कुटुंबच असल्यामुळे कोणतेही प्रश्न विचारल्याशिवाय पटकथा किंवा माझ्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक जाणून न घेताच मी या मालिकेसाठी होकार दिला. मी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनसोबत प्रथमच काम करते आहे आणि या मालिकेत मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्यास उत्सुक आहे.”Also Read : ‘दिल ही तो है’ मालिकेतून पूनम ढिल्लोन करणार पुनरागमन