Join us  

​महाकाली या मालिकेत गगन कंग साकारणार इंद्रदेवाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 10:20 AM

महाकाली... अंत ही आरंभ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या छोट्या पड्द्यावर अनेक पौराणिक मालिका आपल्याला पाहायला ...

महाकाली... अंत ही आरंभ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या छोट्या पड्द्यावर अनेक पौराणिक मालिका आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता प्रेक्षकांना महाकाली यांच्या आयुष्यावर आधरित एक मालिका पाहायला मिळणार आहे. या मालिकेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. महाकाली... अंत ही आरंभ या मालिकेच्या पटकथेवर मालिकेच्या टीमचे काम झाले असून आता मालिकेसाठी कलाकारांची निवड केली जात आहे. या मालिकेत इंद्र देव यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. इंद्र देव या भूमिकेसाठी निखिल आर्याची निवड करण्यात आली होती. निखिलने केसर, रब्बा इश्क ना होवे, तेरे लिये, उतरण, महाभारत यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. निखिलने चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वीच काही कारणास्तव या मालिकेला रामराम ठोकला आहे. आता त्याची जागा गगन कंगने घेतली आहे. गगन या मालिकेत इंद्र देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी गगन सांगतो, इंद्र देव हा देवांचा राजा आहे. इंद्रदेवसारखी महत्त्वाची भूमिका साकारायला मिळत असल्याचा मला आनंद होत आहे. स्वर्गलोकातील कोणतेही दैवत इंद्राशिवाय काहीही निर्णय घेऊ शकत नाही असे आपण अनेक वर्षांपासून ऐकले आहे. त्यांचे महाकालीसोबतचे नाते देखील खूपच वेगळे आहे. या मालिकेचा मी एक भाग होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या या व्यक्तिरेखेवर अधिकाधिक मेहनत घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रेक्षक देखील या व्यक्तिरेखेत माझा स्वीकार करतील अशी मला आशा आहे. गगन कंगने संकट मोचन महाबली हनुमान या मालिकेत काम केले आहे.