Join us

रितेशचा फॅमिली सेल्फी

By admin | Updated: March 17, 2016 02:04 IST

सेल्फी काढण्याची क्रेझ सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. कुठेही फिरायला जा, पार्टी, स्पेशल मोमेंट्स अशा सर्व क्षणांना सेल्फीमध्ये बंदिस्त करण्याचा मोह कोणालाही आवरता

सेल्फी काढण्याची क्रेझ सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. कुठेही फिरायला जा, पार्टी, स्पेशल मोमेंट्स अशा सर्व क्षणांना सेल्फीमध्ये बंदिस्त करण्याचा मोह कोणालाही आवरता येत नाही. आता पाहा ना, आपला मस्तीजादा रितेश देशमुख सध्या त्याच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे. रितेशची जॉइंट फॅमिली असून तो त्याच्या आईसोबतच राहतो. मग, अशा हॅपी फॅमिलीमध्ये जर सर्व जण एकत्र आले तर साहजिकच मजा, मस्ती होणारच. अशीच मजा, मस्ती रितेशच्या फॅमिलीमध्ये सुरू आहे. रितेश, जेनेलिया, त्याची आई वैशाली देशमुख, भाऊ अमित व धीरज आणि त्या दोघांच्या पत्नी, असा त्यांचा देशमुख परिवार डायनिंग टेबलवर एकत्र आला होता. सर्व जण एकदम रिलॅक्स मूडमध्ये असतानाच हा क्षण रितेशने कायमचा सेल्फीमध्ये कैद करून ठेवला आहे.