Join us

रिचा पडली पुन्हा प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2016 15:35 IST

रिचा गुजरातीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण नवऱ्यासोबत सतत उडत असलेल्या खटक्यांमुळे तिने काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. रिचा ...

रिचा गुजरातीचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण नवऱ्यासोबत सतत उडत असलेल्या खटक्यांमुळे तिने काही महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला. रिचा पुन्हा प्रेमात पडली असून ती लवकरच लग्न करणार आहे. विशाल नावाच्या एका व्यवसायिकाशी रिचाची काही महिन्यांपूर्वी भेट झाली होती. या भेटीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यांनी दोघांनी लवकरच लग्नही करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल हा प्रत्येक गोष्टीत माझ्या पाठिशी उभा राहतो. तसेच मला तो खूप जमजून घेतो असे ती सांगते. रिचा आणि विशालचे पालकही एकमेकांना भेटले आहेत. त्यांचे पालकही या नात्यासाठी खूप खूश असल्याचे ती सांगते.