मालिकेसाठी रियुनियन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 15:06 IST
महेश भट्टच्या दिल है के मानता नही या चित्रपटाला अनू मलिकने संगीत दिले होते. तर या चित्रपटात अनुराधा पौडवाल ...
मालिकेसाठी रियुनियन
महेश भट्टच्या दिल है के मानता नही या चित्रपटाला अनू मलिकने संगीत दिले होते. तर या चित्रपटात अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गाणी गायली होती. या चित्रपटातील गाणी आज इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. अनू मलिक, अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांची टीम अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र येणार आहे. नामकरण या मालिकेसाठी धुप का एक तुकडा हे गाणे कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल गाणार आहेत तर या गीताला अनू मलिक संगीत देणार आहे. महेश भट्ट यांच्या चित्रपटातील गाणी खूपच छान असतात. त्याचप्रमाणे नामकरण या मालिकेमधील गाणीही अतिशय चांगली व्हावीत यासाठी ते सध्या प्रयत्न करत आहेत. या मालिकेविषयी अनुराधा सांगतात, "या मालिकेची कथा मला खूपच आवडली. एक सामाजिक विषय खूपच चांगल्याप्रकारे या मालिकेत मांडला गेला आहे."