Join us

​या कारणामुळे हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर या कार्यक्रमाच्या सेटवर ईशा गुप्ताला आवरले नाहीत तिचे अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 15:08 IST

गेल्या काही आठवड्यांत & TV वरील हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सगळ्याच स्पर्धक जोड्यांनी ...

गेल्या काही आठवड्यांत & TV वरील हाय फिव्हर.. डान्स का नया तेवर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सगळ्याच स्पर्धक जोड्यांनी उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर केले आहेत. त्यांच्या परफॉर्मन्सेसमुळे केवळ परीक्षक नाही तर प्रेक्षकही थक्क झाले आहेत. कोणतीही थीम असो वा कोणतेही प्रॉप्स वापरायचे असोत... अपेक्षेपेक्षा खूप चांगली कामगिरी स्पर्धकांनी केली असून नृत्य परफॉर्मन्ससाठीच्या परीक्षणाचा दर्जा यामुळे वाढला आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये, इशा गुप्ता या नव्या जजने सर्व स्पर्धकांसाठी प्रॉपसोबत नृत्य करण्याचे आव्हान दिले होते. सर्वच स्पर्धकांनी एलईडी लाईट्स, रंगीत कागद, जाएण्ट व्हील आणि स्लीपर्ससारखी क्वचित वापरली जाणारी वस्तू आपल्या परफॉर्मन्समध्ये वापरली. केवळ समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी नव्हे तर आपल्या भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणून नृत्याकडे पाहिले जाते. यातल्या एका जोडीने तर त्यांच्या नृत्यातून परीक्षकांना अक्षरशः निःशब्द केले आणि त्यांच्या परफॉर्मन्समुळे सगळ्यांचेच डोळे पाणावले. घुंगरांचा वापर प्रॉप म्हणून करून आशिष पाटील या स्पर्धकाने नर्तक बनण्याचा लक्षवेधी आणि हृद्य प्रवास फारच परिणामकारकरित्या सादर केला. त्याच्या या परफॉर्मन्सला भावनिक आणि अद्वितीय साथ देणाऱ्या ऋतुजानेही या प्रवासाच्या कथेला परफेक्ट स्पर्श केला. या परफॉर्मन्समुळे लारा दत्ता आणि अहमद खान निःशब्द झाले. इशा गुप्ताला तर तिचे अश्रू आवरले नाही. इशा या परफॉर्मन्सबाबत म्हणाली, “माझ्या डोळ्यांसमोर साक्षात नटराजच नृत्य सादर करत असल्याचा मला भास झाला. तुझ्या डोळ्यातून आणि चेहऱ्यावरील हावभावांतून तुझे दुःख समजत होते आणि नृत्याप्रती तुझी असलेली ओढ त्यातून दिसत होती. तुझा परफॉर्मन्स किती सुंदर होता, हे मी शब्दांत व्यक्तही करू शकत नाही.’’हाय फिव्हरची परीक्षिका लारा दत्तानेही इशाच्या या बोलण्याला दुजोरा देत ती म्हणाली, “या मंचावर मी आजवर पाहिलेला हा सर्वांत आत्मिक परफॉर्मन्स होता. मला तुझा हा परफॉर्मन्स पाहता आला याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते. तू आज आमची मान अभिमानाने उंचावली आहेस.’’Also Read : महेश भुपतीसोबत लग्न करण्याआधी लारा दत्ता या अभिनेत्यासोबत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...