Join us  

या कारणामुळे गुलाम फेम परम सिंगला बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 3:25 AM

गुलाम ही मालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली होती. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण या ...

गुलाम ही मालिका जानेवारी महिन्यात सुरू झाली होती. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण या मालिकेचा टिआरपी चांगला असतानादेखील ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना २५ ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत परम सिंग रंगीला ही भूमिका साकारत होता. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे कळल्यानंतर त्याला धक्काच बसला असल्याचे तो सांगतो. गुलाम ही मालिका तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडत होत्या. तरीही ही मालिका प्रेक्षकांचा निरोप का घेत आहे हा प्रश्न परम सिंगला पडला आहे. तो सांगतो, मी या मालिकेत साकारत असलेल्या रंगीला या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करत होते. तसेच ही मालिका प्रेक्षकांना आवडत देखील होती. त्यामुळे ही मालिका अशी अचानक का बंद करण्यात आली हेच मला कळले नाही. ही मालिका संपणार हे मला ज्यावेळी कळले, त्यावेळी मला धक्काच बसला होता. कारण हा निर्णय खूपच कमी कालावधीत घेण्यात आलेला होता. काही वेळा अनेक गोष्टी तुमच्या हातात नसतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर चिंता व्यक्त करण्यापेक्षा त्या गोष्टीला विसरून दुसऱ्या कामात स्वतःला गुंतून घ्यावे असे मला वाटते. या मालिकेचे चित्रीकरण आम्ही दिवस रात्र करत होतो. मी महिन्यातील २८ दिवस तरी चित्रीकरण करत होतो. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका माझ्या आयुष्याचा एक भाग बनली होती असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. या मालिकेच्या टीमकडून मी खूप काही शिकलो आहे. त्यामुळे ही मालिका मी नेहमीच मिस करणार. आता मी काही दिवसांचा ब्रेक घेणार असून फिरायला जाणार आहे. त्यानंतर मी पुढील कामाचा विचार करेन.