Join us  

‘रामायण’ मालिकेचा एपिसोड पाहून भावूक झाला ‘रावण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 7:05 PM

सर्व नागरिक या भागांचा पुरेपूर आनंद घेत असून नुकतेच या मालिकेचा एपिसोड बघून यात रावणाची भूमिका साकारलेले अरविंद त्रिवेदी भावूक झाल्याचे कळतेय. ते नॉस्टॅल्जिक झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना व्हायरसमुळे कर्फ्यु घोषित केला. त्यानंतर सर्व जनता घरातच बंदिस्त झाली. घरकाम, व्हिडीओ, हॉबीज याच्यात सर्वांचा वेळ जातो. पण, त्याशिवाय वेळ घालवण्यासाठी काही पाहिजे ना? म्हणून नुकतीच एक जुनी पौराणिक मालिका ‘रामायण’ टीव्हीवर पुन्हा प्रक्षेपित करण्यात येत आहे. सर्व नागरिक या भागांचा पुरेपूर आनंद घेत असून नुकतेच या मालिकेचा एपिसोड बघून यात रावणाची भूमिका साकारलेले अरविंद त्रिवेदी भावूक झाल्याचे कळतेय. ते नॉस्टॅल्जिक झाले. त्यांना सेटवरील जुने दिवस आठवल्याचे ते सांगतात.

दमदार अ‍ॅक्टिंग, रूबाब, संवादफेक यांच्यामुळे अरविंद त्रिवेदी यांनी त्यांना मिळालेली रावण ही भूमिका गाजवली होती. त्यांच्याप्रमाणे कुणीच आत्तापर्यंत ती चांगल्याप्रकारे रंगवू शक ले नाही. प्रेक्षकांना रावण म्हटल्यावर अरविंद त्रिवेदी यांचाच चेहरा आजही डोळयांसमोर येतो. आज ते ८२ वर्षांचे असून त्यांना चालता-फिरता येत नाही. पण, त्यांनी नुकताच लोकाग्रहास्तव सुरू झालेल्या या मालिकेचा एपिसोड पाहिला अन् ते जुन्या आठवणीत हरवले. ते भावूक झाल्याचे समजतेय. या शोनंतर ‘महाभारत’ आणि शाहरूख खानचा शो ‘सर्कस’ सुरू करण्यात आला आहे. 

 ८०च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता क्वचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली ही भूमिका इतकी अफाट गाजली की, लोक चक्क घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते़ आजही अरूण गोविल यांच्या लोक पाया पडतात, एकंदर काय तर या मालिकेने अरूण गोविल यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. 

टॅग्स :रामायणमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस