Join us

रसिका सुनीलने बॉयफ्रेंड आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 15:12 IST

सध्या रसिका लॉस अँजेलिसमध्ये असून तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनायाच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. रसिका सुनील सोशल मीडियावर सक्रीय असून ती आपल्या चाहत्यांना या माध्यमातून अपडेट देत असते. सध्या रसिका लॉस अँजेलिसमध्ये असून तिथले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

नवीन वर्षाच्या सुरूवातीला रसिकाने ती डेट करत असलेल्या व्यक्तीबद्दल सांगितले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्रामवर त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हा व्हिडीओ लॉस अँजेलिसमध्ये न्यूपोर्ट बीचचा असून यात ती डॉल्फिन दाखवताना दिसते आहे. या फोटो आणि व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

रसिका सुनीलने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती आदित्य बिलागी याला डेट करते आहे. तिने म्हटले की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. मी आणि आदित्य सध्या लॉस अँजेलिसमध्ये नवीन वर्षात एकत्र आहोत. मी आनंदी ठिकाणी आहे.

नुकतेच रसिकाच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिने या पोस्टमध्ये लिहिले होते की, मी काही दिवसांपासून आजरी होते. पण आदित्यने माझी खूप काळजी घेतली. त्याने माझ्या औषधांपासून खाण्यापर्यंत सगळ्याच गोष्टीं व्यवस्थिपणे पाहिल्या. तसेच माझे घर खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. त्याच्यामुळेच मी माझ्या घरातील मंडळींना मिस केले नाही.

आदित्य बिलागीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टनुसार तो इंजिनिअर, डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि तो लॉस अँजेलिसमध्ये राहातो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर रसिकाचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

रसिका सुनीलला माझ्या नवऱ्याची बायकोमधील शनायाच्या भूमिकेतून घराघरात लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती बसस्टॉप, गर्लफ्रेंड व गॅटमॅट चित्रपटात झळकली आहे.

टॅग्स :रसिका सुनिलमाझ्या नवऱ्याची बायको