Join us  

'राजा रानीची गं जोडी'मधील रणजीत आणि संजू दिसणार कुल लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 7:00 AM

आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत.

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजूने अनेक अडथळे पार पाडत रणजीतची निर्दोष सुटका केली. संजीवनीच्या प्रयत्नांना आखे यश मिळाले . रणजीत घरी परतणार आहे. मालिकेमध्ये रणजीतच्या मदतीने संजू गुन्हेगारांना धडा शिकवताना दिसणार आहे.  पण आता राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये संजू आणि रणजीत लवकरच एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहेत.

पुन्हा एकदा राजा रानीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येणार यात शंका नाही. संजू रणजीतला डेटवर घेऊन जाणार आहे आणि याचसाठी राजा रानी कुल लुकमध्ये दिसणार आहेत. खास डेटसाठीची संजूची जय्यत तयारी देखील आहे.

संजीवनी बुलेट चालवणार आहे. ही राजा रानीची डेट नक्कीच खास असेल. रणजीतसाठी अजून काय काय सरप्राईझ असणार आहे हे येत्या सोमवारच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये राजा रानीवर ओढवलेले संकट अखेर दोघांनी मिळून परतवून लावले आहे. पुन्हा एकदा वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही. संजू आणि रणजीत एकमेकांच्या साथीने मोठयातलं मोठं संकट दूर करतात.

रणजीतच्या मार्गदर्शनामुळे संजूने खर्‍या गुन्हेगारांचा शोध लावला आणि गुलाबचा डाव मोडीस काढला आहे. संजूची जिद्द आणि प्रयत्नामुळे रणजीतची निर्दोष सुटका होणार आहे. 

गुलाब रणजीतला जी कठोर शिक्षा देण्याचा बेत आखत होती तो आता संजूमुळे पूर्ण होऊ शकणार नाही. मीडियासमोर देखीलं संजू आणि रणजीचे कौतुक होताना दिसणार आहे.

टॅग्स :राजा रानीची गं जोडीकलर्स मराठी