जेव्हा दुसºया दिवशी पहिला गट म्हणजेच बानी जे, रोहन मेहरा आणि नीतिभा कौल यांना कॉल सेंटरवाल्यांची भूमिका साकारावी लागली तेव्हा मात्र लोपामुद्राने बानीला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. ग्राहकाच्या भूमिकेत तिने बानीला कॉल करून उलट-सुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. बानीनेदेखील त्या प्रश्नांचे उत्तर टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र खरी गंमत तेव्हा आली जेव्हा लोपाने बानीला तिच्या आईविषयी प्रश्न विचारला. बस्स... याच कारणाने बानीचा पारा चढला. तिने हातातील फोनची तोडफोड करून थेट लोपाचे दिशेने धाव घेतली. }}}} ">http://}}}} ">.@bani_j loses her calm after @lopa9999 makes personal comments about her mother during the Call Center task! #BB10#videopic.twitter.com/TtTI2ESNtG— Bigg Boss (@BiggBoss) January 13, 2017
सुरुवातीला दोघींमध्ये तू-तू मंै-मैं झाली. त्यानंतर मात्र हा वाद आणखी चिघळला. बघता-बघता दोघीही हाणामारी करायला लागल्या. बानीने लोपाला धक्के देत तिला घट्ट मिठीत पकडले. लोपानेदेखील तिच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. दोघींमधील वाद वाढत असतानाच मनू आणि मनवीरने मध्यस्थी करीत हा वाद सोडविला, परंतु यामुळे दोघींमधील दुश्मनी आणखी वाढल्याने पुढील काळात याचे काय परिणाम दिसतील हे सांगणे मुश्किल आहे. त्याचबरोबर दोघींच्या या वादावर आता बिग बॉस आणि ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये सलमान काय भूमिका घेणार हे बघणे मजेशीर ठरेल.}}}} ">The Call Center task turns ugly after @lopa9999 & @bani_j go out of control! Who are you supporting in this cat-fight? #BB10pic.twitter.com/K4hF9lUy46— Bigg Boss (@BiggBoss) January 13, 2017