Join us  

Video : कुणी म्हणावं वेडी, कुणी म्हणावं खुळी...! राखी सावंतने पुन्हा एक नवा अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:55 AM

राखीचा ‘नागीन’ अवतार तुम्ही नुकताच पाहिला. आता राखीचा आणखी एक अवतार समोर आलाय.

ठळक मुद्दे‘बिग बॉस 14’ मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली.

‘बिग बॉस 14’च्या घरातील राखी सावंतच्या एका एका करामतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आता शो संपला आहे पण राखीच्या करामती संपलेल्या नाहीत. सोशल मीडियावरचा राखीचा ‘नागीन’ अवतार तुम्ही नुकताच पाहिला. आता राखीचा आणखी एक अवतार समोर आलाय. होय, आता राखीने चक्क काजोल आणि प्रियंका चोप्राचे रूप धारण केलेय. तिचा हा नवा व्हिडीओही सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

‘माय नेम इज खान’ या सिनेमातील  ‘तेरा सजदा’ या गाण्यात शाहरूखसोबत काजोल दिसते. पण आता ती जागा राखीने घेतलीये. होय, फेस एडिटींग अ‍ॅपच्या मदतने काजोलचा चेहरा हटवून राखीने त्याजागी स्वत:चा चेहरा फिट केलाय. तर ‘गुंडे’ या सिनेमातील ‘अस्लाम ए इश्क’ हे गाणे सुद्धा तिने असेच एडिट केलेय.

काही दिवसांपूर्वीच राखीने असाचा ‘नागीन’ अवतार धारण केला. श्रीदेवी यांच्या नागीन सिनेमातील ‘मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा’ या गाण्यावर डान्स करतानाचा असाच मॉर्फ व्हिडीओ शेअर केला होता.

‘बिग बॉस 14’ मध्ये राखी सर्वात एंटरटेनिंग कंटेस्टंट होती. एक चॅलेंजर म्हणून तिने घरात एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या फिनालेपर्यंत जाणारी ती एकमेव चॅलेंजर ठरली. टॉप 5 मध्ये जागा पक्की केल्यानंतर 14 लाख रुपए घेऊन राखीने शो सोडला होता.  आता शो संपला आहे आणि राखी आपल्या आईजवळ परतली आहे. राखीची आई कॅन्सरशी लढतेय. तिच्यावर उपचार सुरु आहेत. पण इतक्या दु:खाकष्टानंतरही राखी बिग बॉसच्या घराबाहेरही लोकांना एंटरटेन करतेय.

टॅग्स :राखी सावंत