Join us  

VIDEO : ती भेटायला गेली, तो आलाच नाही...! राखी सावंतला बॉयफ्रेन्ड आदिलने दिला धोका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 1:41 PM

Rakhi Sawant Breakup : राखी दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. पण काल असं काही घडलं की, राखीचे चाहते टेन्शनमध्ये आले...

Rakhi Sawant Breakup : राखी सावंत (Rakhi Sawant ) नेहमीच चर्चेत असते. प्रसंग काहीही असो, राखी लोकांना एंटरटेन करणं विसरत नाही. सध्या राखी दुबईचा यंग बिझनेसमॅन आदिल दुर्रानीला डेट करतेय. गेल्या काही दिवसांपासून राखी सतत आदिलसोबत फिरताना दिसतेय. पण काल असं काही घडलं की, राखीचे चाहते टेन्शनमध्ये आले. होय, राखीचा विमानतळावरचा व्हिडीओ पाहून राखी व आदिलचं ब्रेकअप झाल्याचं मानलं जात आहे.राखी सावंत नुकतीच एअरपोर्टवर दिसली. अतिशय दु:खी चेहऱ्यानं ती परतली. एअरपोर्टवर पापाराझींशी बोलताना राखीनं आपलं दु:ख व्यक्त केलं.

‘मी दोन तास फ्लाईटमध्ये नुसती रडत होते. माझं काजळही पसरलं...,’ असं ती म्हणते. यावर कोई नहीं, आदिल भाई को व्हिडीओ कॉल करके बात कर लेना, असं एक फोटोग्राफर म्हणतो. यावर, ‘मी आता त्याच्याशी बोलणार नाही. काल मी त्याला भेटायला गेले होते. पण तो आलाच नाही. मी काल त्याची वाट पाहिली आणि आज मी परत आले. तो आला नाही. मी त्याला अजिबात कॉल करणार नाही. सेल्फ रिस्पेक्ट आहे. मी दिल्लीला त्याला भेटायला गेले होते. आम्ही दोघे एकत्र परत येणार होतो. मी खूप दु:खी आहे,’ असं तिने सांगितलं.

राखी कितीही उदास असली तरी ती लोकांना हसवणं विसरत नाही. एअरपोर्टवर अनेक लोक तिच्यासोबत सेल्फी घ्यायला आले. यावेळी, ‘चलो, 500-500 रूपये दो जल्दी’ असं ती  सेल्फी घेण्याऱ्यांना म्हणाली. तिचं ते वाक्य ऐकून सगळे जण हसू लागले.

काही महिन्यांआधी राखीने रितेशची पती म्हणून ओळख करून दिली होती. पण ‘बिग बॉस 15’मधून बाहेर येताच राखी व रितेश यांच्या वाद सुरू झाले. यानंतर काही महिन्यांनी राखीच्या आयुष्यात आदिलची एन्ट्री झाली. गेल्या काही दिवसांत आदिल व राखी एकत्र दिसायचे. पण राखीचा हा व्हिडीओ बघता, दोघांचं ब्रेकअप झाल्याचं मानलं जात आहे. अर्थात खरं काय हे राखीलाच ठाऊक़

टॅग्स :राखी सावंत