मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला राकेश रोशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 03:33 IST
मराठी चित्रपटांच्या प्रेमात बॉलीवुड कलाकाराची आणखी एक भर पडली आहे. चक्क, बॉलीवुडचे स्टार दिग्दर्शक राकेश रोशन मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला ...
मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला राकेश रोशन
मराठी चित्रपटांच्या प्रेमात बॉलीवुड कलाकाराची आणखी एक भर पडली आहे. चक्क, बॉलीवुडचे स्टार दिग्दर्शक राकेश रोशन मराठी चित्रपटाच्या मुहूर्तला उपस्थिती लावतात ही एका मराठी माणसासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. विचारात नका पडू चित्रपटाच नाव ही सांगते. 'फॅमिली ४२०' या चित्रपटाचे नाव आहे. दिग्दर्शन संतोष गायकवाड यांनी केले असून संकल्पना देव राज यांची आहे.तर अवधूत गुप्ते, वैशाली माडे, सुदेश भोसले यांनी गाणी गायली आहेत. तसेच या चित्रपटात विजय पाटकर, विजय कदम, भूषण कडू, सुनील पाल, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे या कलाकारांचा समावेश आहे.