राजीव खिडकीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 11:31 IST
खिचडी या मालिकेत प्रफुल्लची भूमिका साकारणारा राजीव मेहता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हंसाला इंग्रजी शब्दांचे हिंदीत अर्थ सांगण्याची त्याची ...
राजीव खिडकीमध्ये
खिचडी या मालिकेत प्रफुल्लची भूमिका साकारणारा राजीव मेहता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हंसाला इंग्रजी शब्दांचे हिंदीत अर्थ सांगण्याची त्याची पद्धत तर लोकांना खूपच आवडायची. हाच राजीव प्रेक्षकांना खिडकी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. राजीव या मालिकेत एका प्रोफेसरची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत कुसूम या मालिकेत काम करणारी रूपा दिवेतिया त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. राजीवची आई आणि पत्नी ही अंधश्रद्धाळू असून त्यामुळे दोघेही राजीवला अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायला भाग पाडणार आहेत.