Join us  

श्वेता तिवारीच्या दुस-या पतीसह सुरु असलेल्या वादात पहिल्या पतीची झाली एंट्री, राजा चौधरी म्हणाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 4:57 PM

श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेतला होता. राजा चौधरीनंतर श्वेताने अभिनव कोहलीसह लग्न केले होते. मात्र अभिनव कोहलीसह तिचा घटस्फोट झाला असून मुलाची कस्टडी श्वेताकडे आहे.

गेल्या 3 वर्षांपासून अभिनव आणि श्वेता यांच्यात त्यांच्या मुलाच्या कस्टडीवरून वाद सुरू आहेत. या दोघांचा वाद आता वाढला असून जगासमोर आला आहे. अभिनवनेही श्वेता त्याचा मुलगा रेयांसला भेटू देत नसल्याचे सांगत अनेक आरोप केलेत. यावर श्वेतानेही गप्प न राहता अभिनवला प्रत्युत्तर दिले होते. सोशल मीडियावर अभिनवचे श्वेताला कशारितीने मानसिक छळ करतो यासंदर्भाचा एक व्हिडीओच शेअर केला होता.  दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्योरोप करत असताना श्वेताचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरीने यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने श्वेताविषयी सांगितले, श्वेता एक उत्तम आई आहे याबद्दल दुमत नाही. तिचे दुसरे लग्नही टिकले नाही तिचे दुर्दैवच आहे. अभिनवसह दुस-यांदा लग्नबंधनात अडकत काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. याचा अर्थ असा नाही की ती चुकीची आहे किंवा ती वाईट व्यक्ती आहे.चूक दोघांची असू शकते. फक्त श्वेताचीच आहे किंवा अभिनवची असे नाही.

श्वेताने अभिनवला  मुलाला भेटू द्यावे असे मला वाटते. कारण कोणताच बाप हा मुलाला त्रास होईल असे वागणार नाही. त्याचेही तितकेच आपल्या मुलावर प्रेम असते. त्यामुळे श्वेताने अभिनवला मुलाला भेटण्यास रोखणे हे चुकीचे असल्याचे राजा चौधरीने म्हटले आहे. श्वेता सिंगल मदर बनत दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहे. पहिल्या लग्नापासून पलक ही मुलगी आहे तर दुस-या लग्नापासून ४ वर्षाचा मुलगा असून त्याचे नाव रेयांश आहे. 

तब्बल १३ वर्षानंतर वडील राजा चौधरीला भेटली मुलगी पलक,एक्स वाईफसाठी दिला त्याने खास मेसेज १३ वर्षानंतर मुलीला भेटून खूप आनंद झाल्याचे राजा चौधरीच्या चेह-यावर झळकत आहे. बिझी शेड्यअलमधूनही पलकने वडील राजा चौधरीला भेटायला गेली.इतक्या वर्षानंतर पलकला पाहून राजा चौधरी भावूक झाला होता. राजा चौधरीने त्यांच्या या खास भेटीचा फोटो चाहत्यांसह शेअर करत समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे.

आयुष्यातील सुंदर पल, १३ वर्षानंतर मुलीला भेटतोय, अगदी छोटी होती तेव्हा तिला शेवटचे पाहिले होते आणि आता माझी चिमुरडी मोठी झालीय. असे सांगत भावनिक मेसेजही त्याने पत्नी श्वेतासाठी लिहीला होता.

टॅग्स :श्वेता तिवारी