Join us  

प्यारेलालजी यांनी ‘मेरे साई’साठी तयार केले गीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 7:04 AM

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या ...

साई बाबांच्या जीवनविषयक शिकवणीने जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांना प्रभावित केले आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई ही मालिका त्यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचा उद्देश समस्त प्रेक्षकवर्गात दया आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करणे हा आहे. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. सुप्रसिद्ध संगीतकार प्यारेलाल आता या मालिकेसाठी आपला हातभार लावणार आहेत. प्यारेलाल स्वतः साई बाबांचे निःस्सीम भक्त आहेत. त्यांनी साई बाबांच्या जीवनावर आधारित ‘शिर्डी के साई बाबा’ या सुप्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटाला संगीत दिले होते. प्यारेलाल मेरे साई ही मालिका नियमितपणे बघतात. अबीर सूफी आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या प्यारेलालजींना या मालिकेसाठी एक गीत संगीतबद्ध करण्याची इच्छा होती. त्यांनी आपली इच्छा या मालिकेच्या निर्मात्यांकडे व्यक्त केली. काही बैठकींनंतर त्यांनी मेरे साई साठी एक गीत तयार केले आणि हे गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.प्यारेलाल मेरे साई या मालिकेचे फॅन झाले आहेत. त्यांना साईबाबांच्या चरित्राचे हे सरळसाधे आणि हृदयस्पर्शी कथन खूप आवडते. या मालिकेतील विविध सेट्स आणि या मालिकेसाठी उभारलेली शिर्डी या गोष्टी तर त्यांना चांगल्याच भावल्या आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी गाणे संगीतबद्ध करण्याची संधी मिळाल्याने ते प्रचंड खूश झाले आहेत. याविषयी प्यारेलालजी सांगतात, “मी बर्‍याच वर्षांपासून साईंचा भक्त आहे. मला पूर्वीपासून अशी इच्छा होती की साई आणि त्यांचे कार्य यांचे वर्णन करणारे एखादे गीत तयार करावे. मी मेरे साईच्या निर्मात्यांना भेटलो आणि या मालिकेसाठी एक गीत तयार करण्याची माझी इच्छा त्यांना बोलून दाखवली. मेरे साई ही एक अद्भुत मालिका आहे, ज्या मालिकेच्या माध्यमातून करुणा आणि मानवतेचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. मेरे साई सारख्या सुंदर मालिकेसाठी एक गीत तयार करण्याचे भाग्य मला लाभले असल्याने मी खूप खूश आहे.”Also Read : मेरे साई या मालिकेत साईंची भूमिका साकारणारा अबीर सुफी आहे साईंचा भक्त