Join us  

'पद्मावती'च्या प्रमोशनसाठी नाही तर या कारणासाठी दीपिका पोहचली होती बिग बॉसच्या घरात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 7:13 AM

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये घरातील स्पर्धकांची भांडणं, वाद-विवाद या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे बिग बॉसची उत्सुकता ...

छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये घरातील स्पर्धकांची भांडणं, वाद-विवाद या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामुळे बिग बॉसची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. बिग बॉसच्या माध्यमातून विविध सिनेमांचं प्रमोशनही करण्यात येतं.आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी सेलिब्रिटी मंडळी बिग बॉसच्या घरात आवर्जून हजेरी लावतात.दबंग सलमान खानच्या उपस्थितीत आपल्या सिनेमाचं प्रमोशन व्हावं यासाठी अनेकांचा खटाटोप असतो.नुकतंच अभिनेत्री दीपिका पादुकोणसुद्धा बिग बॉसच्या घरात पोहचली. दीपिकाचा पद्मावती हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. मात्र सध्या पद्मावती वादाच्या भोव-यात सापडला आहे.पद्मावती सिनेमा रिलीज होणार की नाही अशी सध्या परिस्थिती आहे. पद्मावती हा सिनेमा 1 डिसेंबर रोजी रसिकांच्या भेटीला येणार होता. मात्र राजपूत संघटना आणि करणी सेनेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सध्या या सिनेमाची रिलीज तारीख पुढे गेली आहे. असं असतानाही दीपिका बिग बॉसच्या घरात का पोहचली असा प्रश्न सा-यांना पडला. दीपिका बिग बॉसच्या घरात सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली नव्हती असं बोललं जात आहे. याच खरं कारण वेगळंच आहे. पद्मावती सिनेमाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांच्यात चर्चा झाली होती. बिग बॉसच्या माध्यमातून पद्मावती सिनेमाचं सत्य सलमाननं रसिकांना सांगावं अशी गळ भन्साळीनं घातल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सिनेमाच्या कथेचं सत्य आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहचेल आणि त्यांचा विरोध मावळेल अशी आशा भन्साळीला होती. संजयच्या सांगण्यावरुन सलमाननं बिग बॉसच्या घरातून पद्मावती सिनेमाच्या वादावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता तर सिनेमाचं रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.   ‘पद्मावती’ या सिनेमातून भन्साळी एका ऐतिहासिक कथानकावर आधारित सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.पण, त्यांनी या सिनेमातून  राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृतीची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली असून,अलाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीमध्ये काल्पनिक दृश्य साकारली आहेत, असा आरोप लावत या सिनेमाचा विरोध करण्यात येत आहे.पण, भन्साळींनी मात्र सुरुवातीपासूनच आपल्या भूमिकेवर ठाम राहत इतिहासाची छेडछाड करणारे कोणतेही चुकीचे दृश्य या सिनेमात नसल्याचे स्पष्ट केले आहे.