Join us

‘मेरी दुर्गा’च्या सेटवर विकी आहुजा बनला अनन्याचा शिक्षक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:30 IST

मुलगी शिकली, प्रगती झाली या विचाराचा असणारा यशपाल आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आहोरात्र मेहनत करतो.तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु असलेला यशपालचा ...

मुलगी शिकली, प्रगती झाली या विचाराचा असणारा यशपाल आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आहोरात्र मेहनत करतो.तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुरु असलेला यशपालचा संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आले आहे. यशपाल चौधरी आणि दुर्गा या बाप लेकीच्या नात्याची ही कथा रसिकांसाठीही एक प्रेरणादायी ठरतेय.बाप आणि लेकीचं नाते,पित्याच्या लेकीकडून असलेल्या आशा-अपेक्षा यांचे हळूवार आणि तितकेच भावनिक दर्शन या मालिकेत रसिकांना पाहायला मिळतंय. यशपाल चौधरी आणि दुर्गा या बाप लेकीच्या नात्याची ही कथा आहे. ‘स्टार प्लस’वरील ‘मेरी दुर्गा’  ही नवी मालिका असून यशपाल चौधरीची भूमिका साकारणारा ज्येष्ठ अभिनेता विकी आहुजा याने या मालिकेतील आपली मुलगी दुर्गाबरोबरचे (अनन्या अगरवाल) नाते अधिक दृढ करण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे.विकीने अनन्याच्या शिक्षकाची भूमिका स्वीकारली असून तो तिचा अभ्यास घेऊ लागला आहे. सेटवर अनन्याची आई नेहमीच तिच्या अभ्यासाचे साहित्य घेऊन आणि शाळेतील अभ्यासाची माहिती घेऊन सज्ज असली, तरी अलीकडे विकीने दोन प्रसंगांच्या मधल्या वेळेत स्वत:च तिचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली आहे, असे आमच्या कानावर आले आहे.याविषयी विकीने सांगितले, “मालिकेचं चित्रीकरण आणि शाळेचा अभ्यास यांची सांगड अनन्याने उत्तमरीत्या घातली आहे. ती तिचे अग्रक्रम कधी चुकवीत नाही… पण आमच्यातील नातं अधिक दृढ व्हावं आणि तिला अभ्यासात मदत करावी, या हेतूने मी तिचा अभ्यास नियमितपणे घेण्यास सुरुवात केली आहे. चित्रीकरण करताना तिने दाखविलेल्या उत्कृष्ट अभिनयाने मी नेहमीच चकित होतो आणि आता तिचा अभ्यास घेताना मला तिचा निग्रह आणि निर्धार कुठून येतो, ते दिसतं.” ‘मेरी दुर्गा’ मालिकेत यशपाल आणि त्याची 12 वर्षांची मुलगी दुर्गा यांच्यातील नातेसंबंधांवर भर देण्यात आला आहे. शाळेत शिपाई असलेल्या यशपालला आपल्या मुलीला खूप शिकवून उज्ज्वल भवितव्यासाठी सिध्द करायचे असते.