शक्तीने केले हृतिकला प्रपोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:39 IST
शक्ती मोहन सध्या डान्स प्लस 2 या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमात नुकताच अभिनेता हृतिक रोशन त्याच्या मोहेंजोदडो ...
शक्तीने केले हृतिकला प्रपोज
शक्ती मोहन सध्या डान्स प्लस 2 या कार्यक्रमात मेन्टॉरची भूमिका बजावत आहे. या कार्यक्रमात नुकताच अभिनेता हृतिक रोशन त्याच्या मोहेंजोदडो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याला पाहाताच शक्ती प्रचंड खूश झाली. शक्तीला लहानपणापासूनच हृतिक खूप आवडतो. शक्ती तिच्या शालेय जीवनात हॉस्टेलमध्ये राहात असे. त्या हॉस्टेलच्या भिंतीवर तिने हृतिकची भली मोठी पोस्टर्स लावली होती आणि या पोस्टरला कोणी स्पर्शही केलेला तिला आवडायचा नाही असे ती सांगते. हृतिकसोबत या कार्यक्रमात तिने नृत्य तर सादर केले. पण त्याचसोबत आय लव्ह यू म्हणते तिने त्याला प्रचोजदेखील केले. हृतिकचे लग्न झाले त्यावेळी मला खूपच वाईट वाटले होते. त्याची मी खूप मोठी फॅन आहे. आज त्याला समोर पाहून काय बोलू आणि काय नाही हेच मला कळत नव्हते असे शक्ती सांगते.