प्रशांत भट आज निर्माता म्हणून प्रेक्षकांना माहीत असला तरी त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात ही अभिनयापासून केली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला संस्कृती, इतिहास यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. प्रशांत जवळजवळ 10 वर्षांनी जाना ना दिल से दूर या मालिकेद्वारे अभिनयाकडे वळला आहे. आज अभिनय करताना मी इतक्या वर्षांचा ब्रेक घेतला होता असे कधी वाटतच नाही असे प्रशांत सांगतो. अभिनय करणे तो सध्या खूप एन्जॉय करत आहे. चांगल्या भूमिका ऑफर झाल्या तर यापुढही नक्कीच अभिनय करेन असेही प्रशांत सांगतो.
प्रशांत अभिनय करण्यास उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 15:15 IST