पोरसची अभिनेत्री रिया दीपसी तिच्या बॅगमध्ये ठेवते या गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 16:20 IST
पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, ...
पोरसची अभिनेत्री रिया दीपसी तिच्या बॅगमध्ये ठेवते या गोष्टी
पोरस राजाच्या आयुष्यावर आधारित पोरस ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेच्या कथानकाचे, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचे प्रेक्षक कौतुक करत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेत राजकुमारी बार्सिनची भूमिका अभिनेत्री रिया दीपसी साकारत आहे. या मालिकेतील आगामी भागांमध्ये ती पोरस म्हणजेच लक्ष लालवाणी सोबत युद्ध करताना दिसणार आहे. आता ती हातात तलवार घेऊन लढणार आहे. अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी खूपच कमी अभिनेत्रींना मिळते. अशी वेगळी भूमिका साकारायला मिळत असल्याने रिया सध्या चांगलीच खूश आहे. या मालिकेमुळे राजकुमारीची भूमिका साकारण्याचे तिचे स्वप्न देखील पूर्ण झाले आहे. तिने या मालिकेसाठी नुकतीच तलवारबाजी आणि घोडस्वारी शिकली आहे. या मालिकेमुळे स्वरक्षणाचे धडे देखील तिला मिळाले आहेत. याविषयी रिया सांगते,“ एक राजकुमारीची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक स्वप्न होते. मला पोरस या मालिकेत राजकुमारी बार्सिनची भूमिका साकारायला मिळत आहे, त्याचा मला आनंद होत आहे. तलवारबाजी करणे हा वेगळा अनुभव या मालिकेमुळे मला मिळालेला आहे. मी गेल्या कित्येक दिवसांपासून तलवारबाजी शिकत आहे. लक्ष आणि माझ्यातील युद्धाचे चित्रीकरण करण्यासाठी दीपक दास यांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यामुळे आम्ही खूप चांगल्याप्रकारे हे दृश्य देऊ शकलो.रियासाठी तलवारबाजी शिकणे सोपे होते. कारण तिने तिच्या शालेय जीवनात अनेक खेळांमध्ये भाग घेतला आहे. तिने शालेय जीवनात कराटे देखील शिकली आहे. प्रत्येक मुलीला स्वरक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे असे रियाला वाटते. ती तिच्या बॅगमध्ये नेहमीच मिरपूडचा स्प्रे आणि छोटा चाकू ठेवते."पोरस या मालिकेच्या आगामी भागांमध्ये पुरूने कसा बामिनीवर एक वाईट राजा असल्याचा आणि आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप केला आणि त्याला लढाईचे आव्हान दिले हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. Also Read : या मालिकेद्वारे अरुण इराणी परतल्या छोट्या पडद्यावर