Join us  

‘साम दाम दंड भेद’मध्ये लोकप्रिय मराठी कलाकार आदिश वैद्य करणार एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 7:07 AM

‘साम दाम दंड भेद’ मालिकेत आता एका नव्या कलाकाराचा प्रवेश होणार आहे. सध्या या मालिकेचे कथानक विजय (भानू उदय) ...

‘साम दाम दंड भेद’ मालिकेत आता एका नव्या कलाकाराचा प्रवेश होणार आहे. सध्या या मालिकेचे कथानक विजय (भानू उदय) आणि बुलबुल (ऐश्वर्या खरे) यांच्यातील प्रेम आणि मंदिरा (सोनल वेंगुर्लेकर) करीत असलेल्या विविध कारस्थानांवर केंद्रित झाले असून त्यात आता लोकप्रिय मराठी अभिनेता आदिश वैद्य हा युगच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रवेश करणार आहे.मालिकेत तो अनंतच्या (वरूण तुर्की) कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून प्रवेश करणार असून शेवटी त्याची जोडी वसूबरोबर जुळणार आहे. आदिशने यापूर्वी रात्रीस खेळ चाले, तुमचं-आमचं सेम असतं, गणपतीबाप्पा मोरया वगैरे अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये भूमिका रंगविल्या आहेत.आता त्याने हिंदी मालिकांवर लक्ष केंद्रित करून आपले क्षितीज व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.आदिश सांगतो, “आपलं अभिनयकौशल्य सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला एका व्यासपिठाची गरज असते आणि त्याला आपली ही कला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी,अशी त्याची स्वाभाविक इच्छा असते.आता ‘साम दाम दंड भेद’ मालिकेत मी युगच्या व्यक्तिरेखेद्वारे प्रवेश करीत असून ‘स्टार भारत’ वाहिनीशी मी निगडित होत असल्याचा मला आनंद होत आहे. मी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.ही माझी पहिलीच हिंदी मालिका असून त्यात मी माझं सर्वस्व देण्याचा प्रयत्न करीन आणि ही मालिका यशस्वी करण्यात हातभार लावीन.”‘साम दाम दंड भेद’ मालिकेत भानू उदय आणि ऐश्वर्या खरे यांनी असेच एक धाडसी प्रणयदृष्य सहज आणि विनासंकोच चित्रीत केले आहे.अशा प्रकारचे धाडसी प्रणयदृष्य टीव्हीवर चित्रीत करण्याची या दोन कलाकारांची ही पहिलीच वेळ होती.परंतु कथेची गरज आणि दिग्दर्शकाच्या मागणीनुसार त्यांनी हे दृष्य चित्रीत केले. हे दोघेही व्यावसायिक अभिनेते असून कथेच्या गरजेनुसार कोणतीही दृष्ये चित्रीत करण्यास ते नेहमीच तयार असतात. भानू सांगतो, “खरं सांगायचं झाल्यास टीव्ही मालिकेत मी प्रथमच अशी धाडसी रोमँटिक दृष्यं चित्रीत करीत आहे.ते दृष्य किती सहजपणे पार पडलं,यामुळे मी चकित झालो आहे.खरं म्हणजे रोमान्स करण्यातील माझं कौशल्य पाहून माझी पत्नी चकित झाली आहे कारण प्रत्यक्ष जीवनात मी काही तितकासा रोमँटिक पती नाही.”या दोन्ही कलाकारांचं ऑनस्क्रीन नातं सामंजस्याचं असल्यामुळेच हे दृष्य वास्तववादी झाले असून त्यामुळे ते प्रत्येक प्रेक्षकाचे लक्ष नक्कीच वेधून घेईल.