Join us  

OMG! बाळाला एक महिना होताच या अभिनेत्रीला पुन्हा लागले डोहाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 8:35 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पहिल्या बाळाच्या जन्माला महिना होत नाही तोच दुसऱ्या बाळाच्या तयारीला लागली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी खूप लोकप्रिय आहे. ती कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. नुकतेच अनिताने आपल्या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ती बऱ्याचदा आपल्या मुलासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिने बेबी बंपचेदेखील फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिचा नवरा रोहित रेड्डी देखील आहे. हे फोटो शेअर करताना तिने जे लिहिले ते वाचून चाहते अवाक् झाले आहेत.

अनिता हसनंदानी हिने इंस्टाग्रामवर नवरा आणि तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, गरोदरपणातील माझ्या या पोटाची मला आठवण येत आहे. सध्या माझ्याकडे असे पोट नाही अशी गोष्ट नाही, पण हे एवढे गोंडस नाही. मी आताच दुसऱ्या बाळाच्या तयारीत आहे. रोहितने नुकतेच अनिताला अनफॉलो केले. अनिताचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अनिता हसनंदानीने ९ फेब्रुवारी रोजी आरवला जन्म दिला. रोहित रेड्डीने इंस्टाग्रामवरून आपण बाबा झाल्याची गोड बातमी दिली होती. दोघांनीही या फोटोत पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

एका फोटोमध्ये अनिता तर दुसऱ्या फोटोमध्ये फोनच्या स्क्रीनवर बाळाचा चेहरा दिसत होता. सोबतच आरवला १ महिना पूर्ण झाल्याने त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.

टॅग्स :अनिता हसनंदानी