Join us  

निकलोडियनची मुंबई शहराला भेट, टुगेदर फॉर गुड या उपक्रमातून “भीती दूर करा आणि सुरक्षेला होकार द्या” हे शिकवत मुलांना करणार सक्षम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 4:55 AM

निकलोडियन ही मुलांसाठीची पहिल्या क्रमांकाची वाहीनी मुलांची सुरक्षा या ज्वलंत विषयावर लक्ष केंद्रीत करण्याकरिता “टुगेदर फॉर गुड” हा त्यांचा ...

निकलोडियन ही मुलांसाठीची पहिल्या क्रमांकाची वाहीनी मुलांची सुरक्षा या ज्वलंत विषयावर लक्ष केंद्रीत करण्याकरिता “टुगेदर फॉर गुड” हा त्यांचा जागतिक स्तरावरील सामाजिक उपक्रम पुन्हा घेऊन आले आहेत.तरूण मुलांमध्ये सायबर सुरक्षा,तसेच शारिरीक आणि मानसिक छळ यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे, सध्याच्या घडीला त्यांच्यात वैयक्तिक सुरक्षा जागृती निर्माण करण्याची गरज आहे.निकलोडियनच्या जगात लहान मुलांना मध्यवर्ती ठेवून,“भीती दूर करा आणि सुरक्षेला होकार द्या” या तत्त्वान्वये आम्ही त्यांना त्यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देत असून सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत.नक्की जोखीम काय आणि आणि भीती न ठेवता प्रौढांपर्यंत कसे पोचायचे हे सर्वप्रमथम मुलांना शिकवले जाणार आहे.मुलांच्या सुरक्षेच्या उपायांच्या पुनर्स्थापनेकडे लक्ष देऊन, निकलोडियनने अग्रगण्य विनासरकारी “अर्पण” या संस्थेसह भागीदारी केली आहे, जे मुलांच्या सुरक्षेसंबंधित प्रश्नांना आवश्यक प्रतिसाद देऊन काळजीपूर्वक आणि हस्तक्षेप करून व्यक्तीगत आणि कुटुंबालादेखील सक्षम करण्याचे कार्य करतात. अर्पणमधील तज्ज्ञांसह मुलांचे आवडते निकटून्स “भीती दूर करा आणि सुरक्षेला होकार द्या” या उपक्रमाला प्रेरणा देण्यासाठी आणि जागृती निर्माण करण्यासाठी विविध शहरातील शाळांशी संपर्क साधून कार्यक्रम आयोजित करत आहेत.शाळांमध्ये शिक्षक आणि प्रौढांना मुलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर कशा प्रकारचे व्यवस्थापन करायचे याचे प्रशिक्षण देण्यात येते.“निकलोडियन इंडियाच्या ‘टुगेदर फॉर गुड’ या उपक्रमाकरिता त्यांचे भागीदार होऊन आम्हाला अत्यानंद होतो आहे.शारिरीक छळापासून आणि त्यातून होणाऱ्या परिणामांपासून मुलांनी काय काळजी घ्यायला हवी यासाठी गेले १० वर्षे अर्पण कार्यरत आहे. काही सर्वेक्षणातून असे लक्षात आले आहे की योग्य वयात मुलांना सक्षम बनविले आणि त्यांना कौशल्य शिकविले तर ते स्वतःची सुरक्षा करू शकतात.पालक आणि काळजी घेणाऱ्यांनादेखील हे ज्ञान दिल्यास तेही मुलांकरिता जागरूक आणि संरक्षणात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देऊ शकतात. निकलोडियनच्या पाठिंब्याने लाखो मुले आणि पालकांना व्यक्तिगत सुरक्षेचा महत्त्वाचा संदेश देण्याचा हा उपक्रम आहे,” असे श्रीम. शर्लेन मुंजले, संचालक – पब्लिक एंगेजमेंट,अर्पण यांनी यावेळी सांगितले.आजच्या काळात मुलांच्या बाबतीत अनेक दुर्दैवी घटना घडत आहेत.अशा परिस्थितीत हा उपक्रम मुले स्वत:ला जोडून घेऊ शकतील, अशा मार्गाने जागरुकता निर्माण करण्यासाठी अभूतपूर्व व्यासपीठ देईल.काही गोष्टींसंदर्भात पालकांना मुलांसोबत चर्चा करणे खूपच अवघड जाते.आम्ही सुरक्षिततेला दिलेले महत्त्व आणि मुलांना त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरणाची निर्मिती करण्यामध्ये मदत करण्यासाठी निकलोडियनने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करतो,असे स्माईल फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव धाम म्हणाले.