Join us

नया महिसागरचा तिसरा सिझन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 12:44 IST

हॅटस ऑफ प्रोडक्शनची नया महिसागर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नया महिसागर या मालिकेचा दुसरा सिझन सध्या ...

हॅटस ऑफ प्रोडक्शनची नया महिसागर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नया महिसागर या मालिकेचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. पहिल्या सिझनच्या यशानंतर या वर्षाच्या फेब्रुवारीला या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आतादेखील दुसऱ्या सिझननंतर काही महिन्यांच्या ब्रेकनंतर तिसरा सिझन सुरू करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याचे म्हटले जात आहे. पण तिसरा सिझन कधी येणार त्याबाबत निर्मात्यांनी मौन राखणेच पसंत केले आहे. या मालिकेत अपरा मेहता, संदित तिवारी, केतकी दवे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.