गुलमोहर मध्ये नवीन जोडी रोहन गुजर आणि आरती मोरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 18:08 IST
प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं ...
गुलमोहर मध्ये नवीन जोडी रोहन गुजर आणि आरती मोरे
प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवलेली असते. मग ते प्रेम प्रियकर प्रेयसीचं असो, आई मुलाचं किंवा नवरा बायकोचं. नातेसंबंध आणि त्यात असणारं प्रेम वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून झी युवा प्रेक्षकांसमोर सोमवार आणि मंगळवार रात्री ९ :३० वाजता 'गुलमोहर द्वारे आणत आहे. प्रेम, भावना आणि नातेसंबंध यांवर आधारित विविध कथा सांगणारी ही मालिका अनेक वेगवेगळ्या कथेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे.पण आजकालच प्रेम हे लगेच होतं देखील आणि त्याचं ब्रेकअप देखील तेवढ्याच वेगाने होतं. मात्र काही प्रेमाची ब्रेकअप हि अशी असतात कि जरी ब्रेकअप झाले तरी त्यातील भावना या शेवटपर्यंत ताज्या आणि तितक्याच हव्या हव्याशा वाटतात. अशाच एका प्रेमाच्या ब्रेकअपची गोष्ट सांगणारी हि पत्र नावाची कथा आहे. या कथेद्वारे झी युवा एक नवी आणि एक युवा जोडी प्रेक्षकांसमोर आणत आहे. युवा जोडी आहे मराठी चित्रपटश्रुष्टीतील अत्यंत गाजलेली आणि आपल्या सर्वांची आवडती जोडी रमेश देव आणि सीमा देव . आणि त्यांच्याबरोबर नवीन जोडी आहे रोहन गुजर आणि आरती माने. रोहन ला आपण होणार आणि बन मस्का , सून मी या घरची या मालिंकेद्वारे आधी पाहिले आहे आणि आरती मोरे हिला जय मल्हार , अस्मिता आणि दिल दोस्ती दोबारा या मालिकेतून पहिले आहे . या कथेमध्ये श्रेया म्हणजेच आरती मोरे आणि सुबोध म्हणजेच रोहन गुजर हे एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करणारे आहेत मात्र काही कारणावरून त्यांचे ब्रेकअप होतं आणि श्रेया त्याचं दुखात घरी जाताना तिला रस्त्यात एक पाकीट सापडतं ज्यात फक्त १०० रुपये आणि एक अगदी जुन्याकालातील लिफाफा सापडतो त्यात एक चिठ्ठी देखील असते न राहून ती तो लिफाफा उघडून त्यातील चिठ्ठी वाचते, ती चिठ्ठी जवळ जवळ ५० वर्षा पूर्वी शालिनी म्हणजेच सीमा देव यांनी थत्ये आजोबा म्हणजेच रमेश देव यांना त्याच्या प्रेमाचे ब्रेकअप पत्र लिहिले आहे शालिनी आणि थत्ये यांचे देखील एकमेकांवर मनापासून प्रेम होते मात्र घरच्यांच्या विरोधामुळे त्यांचे प्रेम पुढे फुलू नाही शकले आणि म्हणून शालिनीने ते ब्रेकअप पत्र थत्येसाठी लिहिले होतो ज्यामध्ये शालिनीने आपले ब्रेकअप झाले असले तरी आपल्यातल्या भावना मात्र कायम चिरतरुण राहतील अशा आशयाचे मजकूर त्या पत्रामध्ये लिहिला होता आणि आज ५० वर्षानंतर देखील थत्ये आजोबांनी लग्न केले नसून ते आजही ते पत्र रोज वाचतात आणि शालिनीला आठवणींच्या रुपात स्वतःभोवतो असल्याचा आनंद घेतात हि गोष्ट जेव्हा श्रेयाला समजते तेव्हा तिला देखील आपण कुठे तरी सुबोध सोबत खूप घाई करून चुकीचा तर निर्णय घेतला नाही ना अस वाटायला लागतं आणि हे ती सगळं सुबोध सोबत share करते आणि दोघे मिळून ठरवतात कि आजोबा आणि शालिनी आजीला परत मिळवून द्यायचा.