Join us

विभूतीचा नवा अवतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 14:16 IST

भाभीजी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना विभूती नेहमीच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो. विभूती म्हणजेच आसिफ शेख आता प्रेक्षकांना ...

भाभीजी घर पर है या मालिकेत प्रेक्षकांना विभूती नेहमीच वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतो. विभूती म्हणजेच आसिफ शेख आता प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. या मालिकेत तो आता भंगारवाल्याची भूमिका साकारणार आहे. त्याचा लुकही भंगारवाल्यासारखाच असणार आहे. प्रेम एक नवीन व्यवसाय सुरू करणार असून विभूतीला तो व्यवसायात भागीदार बनवणार आहे. सुरुवातीला विभूती भागीदार बनण्यासाठी नकार देणार आहे. पण आपण काहीच काम करत नाही असे सगळेच आपल्याला हिणवतात. त्यामुळे आपणही चांगल्याप्रकारे काम करू शकतो हे सगळ्यांना दाखवून देऊया असा विचार करून विभूती भंगारवाल्याचे काम करायला सुरुवात करणार आहे.