Join us  

Back to work बीग बींनी सुरू केले केबीसीचे शूटिंग, कोरोनानंतर सगळेच बदलल्याची व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:28 PM

लॉकडाऊनदरम्यान अमिताभ यांनी केबीसी 12 साठीही घरून शूट केले होते. शोची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली होती. पण अचानक अमिताभ बच्चनच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शोला ब्रेक लागला होता.

देवीयों और सज्जनों हे शब्द लवकरच पुन्हा एकदा कानावर पडणार आहेत, पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं भावनिक विश्व, पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. आता नव्याने येणा-या पर्वातही नवी आशा नवी स्वप्नांसह स्पर्धकही अमिताभ बच्चन यांच्यासह छोट्या पडद्यावर एंट्री करत रसिकांचे मनोरंजन करणार आहेत. 

कोरोनावर मात केल्यानंतर बीग बी अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती १२' शोच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांसह  आनंद व्यक्त केला आहे. शेअर केलेल्या फोटोत सेटवरील सर्वच क्रू मेंबर्स पीपीई किटमध्ये दिसत आहे.सुरक्षिततेच्या बाबतीत सर्वच खबरदारी घेत शूटिंग सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.  फोटो शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, 'काम पर वापसी, नीलू पीपीई के समंदर KBC 12 शुरू....2000 में शुरू आज 2020...20 साल का सफर...शानदार...जिंदगी का लंबा सफर!' या शोला २० वर्ष पूर्ण झाली आहे. खूप मोठा पल्ला गाठला आहे. यावर विश्वासच बसत नसल्याचे भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

लॉकडाऊनदरम्यान अमिताभ यांनी केबीसी 12 साठीही घरून शूट केले होते. शोची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली होती. पण अचानक अमिताभ बच्चनच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शोला ब्रेक लागला होता.  दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल होते. अखेर कोरोनाला हरवत त्यांनी पुन्हा एकदा जोमाने आपल्या कामाला सुरूवात केली आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन